भाजप भाकरी फिरवणार? बावनकुळे मंत्रिपदी, प्रदेशाध्यक्षपदावर कोणाची वर्णी?

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्याने चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथ घेताच भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार, यावर शिक्कामोर्तब झालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर आता कोणकोणाचा पत्ता कट झाला आणि त्यामागील कारणांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री म्हणून शपथ घेताच आता भाजपचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्याने चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथ घेताच भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार, यावर शिक्कामोर्तब झालंय. मात्र बावनकुळेंनंतर आता भाजपच्या प्रदेशाध्यपदावर कोणाची वर्णी लागणार?  संभावित नावांचा घेतलेला धांडोळा...

Advertisement

नक्की वाचा - एक शिल्लक राहिलेलं मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

चव्हाणांच्या नावाला मोठं वजन...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. सलग चौथ्यांदा रवींद्र चव्हाण आमदार म्हणून निवडून आलेत. नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकेत भाजपला अनेक जागा मिळाल्या. तर कर्जत, माथेरान, बदलापूरमध्येही भाजपला यश मिळालं. चव्हाणांना पालघर, सिंधुदुर्ग पालकमंत्रिपदासह विविध मंत्रिपदांचा अनुभव आहे. रवींद्र चव्हाणांची ठाणे आणि कोकणावर चांगली पकड आहे. नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदर, कोकणातल्या रिफायनरी हे सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच पट्ट्यात आहेत. चव्हाणांचा इथल्या नागरिकांशी चांगला संवाद आहे. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर या भागातली कामं गतीनं होण्यासाठी बळ मिळेल असंही म्हटलं जात आहे.

Advertisement

रवींद्र चव्हाणांनी कोकण आणि ठाण्यातील मविआचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केलाय. ठाण्यात १८ पैकी १६ जागा महायुतीनं जिंकल्या तर कोकणात १५ पैकी १४ जागांवर महायुतीचा विजय झाला. ठाण्यात भिवंडी वगळता आणि कोकणातले सगळे महायुतीचे खासदारही विजयी झाले. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे राज्य चालवणं, पक्षावर पकड ठेवणं आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी बांधणी याबद्दल फडणवीस आणि चव्हाणांचा योग्य समन्वय राहील. चव्हाण ठाण्याचे असल्यानं ठाणे जिल्ह्यातल्या सहा महापालिकांसाठी विशेष मदत होईल. तसच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पक्ष वाढवण्याची संधीही या निमित्तानं मिळणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा

संजय कुटेंचं नावही चर्चेत...
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय कुटे यांच्याही नावाची चर्चा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी होत आहे. संजय कुटे जळगावच्या जामोदहून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संजय कुटे हे कुणबी (बहुजन) समाजाचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बहुजन समाजाचा नेता देण्याचा विचार केला तर कुटेंना संधी आहे.