जाहिरात

Chhatrapati Sambhaji Nagar: '.... माझा फोटो नको'; मुख्य अभियंत्याने आमदार पत्नीला थेट पत्र का लिहिले?

Chhatrapti sambhaji Nagar News: सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर असलेल्या एका मुख्य अभियंत्याने आपल्या आमदार पत्नीला थेट लेखी पत्र पाठवून "तुमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आवरा," अशी विनंती केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: '.... माझा फोटो नको'; मुख्य अभियंत्याने आमदार पत्नीला थेट पत्र का लिहिले?
Chhatrapti sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे.
छत्रपती संभाजीनगर:

सुमित पवार, प्रतिनिधी

Chhatrapti sambhaji Nagar News: सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर असलेल्या एका मुख्य अभियंत्याने आपल्या आमदार पत्नीला थेट लेखी पत्र पाठवून "तुमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आवरा," अशी विनंती केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे  संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी फुलंब्रीच्या आमदार आणि त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण यांच्याकडे ही विनंती केली आहे.

बॅनरबाजीमुळे  डोकेदुखी वाढली

आमदार अनुराधा चव्हाण यांच्या विविध कार्यक्रमांदरम्यान, विशेषतः प्रचार, वाढदिवस आणि योजनांच्या उद्घाटन प्रसंगी, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करणारे आणि शुभेच्छा देणारे बॅनर मोठ्या प्रमाणावर लावले जातात. या बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा फोटो देखील आवर्जून छापला जातो.

( नक्की वाचा : Dombivli News : 'सुसंस्कृत' डोंबिवलीला कुणाचा कलंक? आमदाराच्या भावावर रात्री पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ! )
 

याच बॅनरबाजीमुळे अतुल चव्हाण यांची मोठी अडचण झाली आहे. ते सध्या एका वरिष्ठ शासकीय पदावर (सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता) कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार, सरकारी अधिकाऱ्याचे फोटो अशा राजकीय कार्यक्रमांच्या बॅनरवर छापल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि शासकीय पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल होत असून, माहिती अधिकारात (RTI) अर्ज देखील करण्यात येत आहेत. यामुळे शासकीय कामकाजात अडथळा येत असल्याने अतुल चव्हाण यांना ही बाब अत्यंत त्रासदायक वाटू लागली आहे.

अतुल चव्हाण यांचे थेट पत्र आणि विनंती

या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या अतुल चव्हाण यांनी आपली व्यथा पत्नी आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मांडली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट शब्दांत आपल्या अडचणी सांगितल्या आहेत:

"तुमचे कार्यकर्ते बॅनरवर माझा फोटो वापरत आहेत. त्यामुळे माझ्याविरोधात तक्रारी व माहिती अधिकारात अर्ज येत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की, माझे फोटो बॅनरवर प्रसिद्ध न करण्याच्या सूचना आपण आपल्या स्तरावरून मतदारसंघातील कार्यकर्त्यांना द्याव्यात."

या पत्राद्वारे, अतुल चव्हाण यांनी सरकारी अधिकारी म्हणून आपली नैतिक अडचण आणि कायदेशीर मर्यादा स्पष्ट केली आहे. एका बाजूला पत्नीचे राजकीय कार्य आणि दुसऱ्या बाजूला शासकीय सेवा या दोन्हीची योग्य सांगड घालण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहावर मर्यादा ठेवण्याची विनंती केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com