Hemant Soren Life: हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 49 वर्षाच्या हेमंत सोरेन यांना राजकारणाचं बाळकडू हे घरातूनच मिळालं आहे. मात्र गेल्या 21 वर्षात त्यांनी स्वत:च्या मेहनतीने आपलं राजकारणातील स्थान अढळ केलं आहे. वडील शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संघटना उभी केली. त्या संघटनेला सांभाळण्याचं आणि वाढवण्याचं काम हेमंत सोरेन यांनी केलं. हेमंत सोरेन यांचा जन्म 10 ऑगस्ट 1975 साला झारखंडच्या हाजारीबाग जिल्ह्यात झाला. ज्यावेळी हेमंत सोरेन यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील वेगळ्या झारखंड राज्यासाठी लढाई लढत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हेमंत सोरेन यांचे शालेय शिक्षण बोकारोच्या सेंट्रल स्कूलमध्ये झाले. त्याच काळात त्यांचे वडील शिबू सोरेन हे बिहार विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर हेमंत सोरेन हे पाटण्याला शिकायला गेले. तिथेच ते दहावी पासही झाले. पुढचे शिक्षणही त्यांनी पाटण्यातच केले. नंतर रांचीच्या बीआयटीमध्ये त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेतला. पण त्यांनी त्याचे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले नाही.
पुढे त्यांनी 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांची नियुक्ती झारखंड मुक्ती मोर्चा विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी केले गेली. 2005 मध्ये त्यांनी दुमका विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पण त्या निवडणूकीत स्टीफन मरांडी यांनी त्यांचा पराभव केला. 2009 मध्ये हेमंत सोरेन यांचे मोठे बंधू दुर्गा सोरेन यांचे अकस्मिक निधन झाले. दुर्गा सोरेन हेच शिबू सोरेन यांचे राजकीय वारस होते. पण त्यांच्या निधनानंतर हेमंत सोरेन यांनीच शिबू सोरेन यांना आधार दिला.
2009 साली हेमंत सोरेन यांनी पहिल्यांदा झारखंड मुक्ती मोर्चाकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्याच वर्षी झारखंड विधानसभेची निवडणूक झाली. त्यात त्यांनी दुमका मतदार संघातून निवडणूक लढवली. शिवाय ते या मतदार संघातून विजयी ही झाले. त्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिबू सोरेन यांनीही आपला राजकीय वारस हेमंत सोरेन असतील याचीच जणू घोषणा केली. हे करणे शिबू सोरेन यांच्यासाठी अवघड होते. त्याला कारण ही तसेच होते. स्टीफन मरांडी, साइमन मरांडी आणि चंपई सोरेन हे पक्षातले जेष्ठ नेते होते. अशा वेळी हेमंत सोरेन यांना नेतृत्व देण्याला विरोध झाला. पण शिबू सोरेन यांनी हा विरोध मोडून काढला.
ट्रेंडिंग बातमी - आमदारांनी स्वत:च्या हाताने कार्यकर्त्याला घातली चप्पल , त्यांनी असं का केलं?
2010 साली भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांनी मिळून सरकार स्थापन केले. भाजपचे अर्जुन मुंडा मुख्यमंत्री झाले. तर हेमंत सोरेन हे उपमुख्यमंत्री बनले. ते जानेवारी 2013 पर्यंत या पदावर होते. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी राजकारणातील सर्वात मोठा डाव खेळला तो 2013 मध्ये. स्थानिक पातळीवरील निर्णय आणि महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अर्जुन मुंडा निर्णय घेत नाहीत असा आरोप त्यांनी केला. शिवाय सरकारचा पाठिंबा ही काढून घेतला. पाठिंबा काढल्याने अर्जुन मुंडा यांचे सरकार कोसळले. पुढे सहा महिने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नंतर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चाने सरकार स्थापन केले.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंच्या आमदाराचा पराभव , आता थेट राजकीय निवृत्तीबाबत विधान, नक्की काय घडलं?
हेमंत सोरेन पहिल्यांदा जुलै 2013 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी पहिल्या टर्ममध्ये 17 महिने काम केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाला पराभव स्विकारावा लागला. त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. या निवडणुकीत त्यांना केवळ 19 जागा मिळाल्या. 2009 च्या तुलनेत ती एकने जास्त होती. पुढे त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी स्विकारली. तत्कालीन रघुवर दास सरकार विरोधात सोरेन यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. अनेक प्रकरणी त्यांनी बाहेर काढली होती. जमीन कायद्यातील बदलाला त्यांनी विरोध केला होता. आदिवासींच्या हा अस्मितेचा प्रश्न असल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला.
ट्रेंडिंग बातमी - बाबा तुमचा खूप अभिमान वाटतो! श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र
त्यांच्या या भूमीकेला आदिवासी समाजाचे मोठे समर्थन मिळाले. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा चांगला वापर केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दला बरोबर आघाडी केली. या आघाडीला एकूण 47 जागा मिळवत बहुमत मिळवलं. त्यामुळे भाजपचे रघुवर दास यांचे सरकार पाय उतार झाले. त्यानंतर 29 डिसेंबर 2019 साली हेमंत सोरेन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 2019 ते 2024 पर्यंत मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले.
ट्रेंडिंग बातमी - Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?
पुढे तर त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. 31 जानेवारी 2024 ला ईडीने त्यांनी अटक करत जेलमध्येही पाठवले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाच महिने ते सत्तेच्या बाहेर राहीले. जेलमध्ये असताना संघर्ष करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. ते जेलमध्ये असताना त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांनी राजकारणाची धुरा सांभाळली. त्यानंतर सोरेन जेल बाहेर आले. पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या पेक्षा मोठा विजय मिळवला.