'मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना....' चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा

Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vidya Chavan vs Chitra Wagh
मुंबई:

Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष आणखी चिघळला आहे. चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकावलं,आपल्यावर आरोप करायला लावले, असा आरोप विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावेळी त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. 

विद्या चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेला चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. विद्या चव्हाण यांनी सूनेचा छळ केला. त्यांच्या लहान मुलानं आईसमान वहिनीचा विनयभंग केला, असा गंभीर आरोप वाघ यांनी यावेळी केला. मी गौरी चव्हाण यांना मदत केली, असं सांगत चित्रा वाघ यांनी सर्व आरोपांना उत्तर दिलं. यावेळी चित्रा वाघ यांनी शरद पवार यांचं नाव घेत विद्या चव्हाण यांना इशारा दिला. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'.... नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल'

विद्या चव्हाण माझ्याबद्दल चांगल बोलतील ही अपेक्षा नाही. यापूर्वी वेगवेगळ्या बायकांना बसवून मी चित्रा वाघ कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तीन ते चार वेळा केला आहे. बऱ्याच मोठ्या गॅपनंतर माझ्यामुळे का होईना विद्या चव्हाण यांचं दर्शन टीव्ही चॅनलला झालं, त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत.

मी शरद पवारांबद्दल काहीही बोलले नाही. मी कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केलं. माझ्यासाठी तुम्ही काय केलं? मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल, असा इशारा वाघ यांनी दिला. 

Advertisement

( नक्की वाचा : मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड )
 

त्या पेन ड्राईव्हमधील संभाषण माझं, देवेंद्र फडणवीस यांचं नाही. तो आवाज सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पटलावर ठेवलं आहे.  “मार्च 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते. तिथेच विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण आणि त्यांचे बाबा आले होते. विद्या चव्हाण यांना सुनेकडून मुलगा हवा होता. पण पहिली मुलगी झाली. मुलगा हवा म्हणून विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केला”, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

विद्या चव्हाण यांच्या लहान मुलानं आईसमान असलेल्या वहिनीचा विनयभंग केला. गौरी चव्हाण आणि वडिलांना मारहाण केली. त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली. पण विद्या चव्हाण यांच्या दबावामुळे पोलिसांनी हाकलून दिलं. गौरी चव्हाण महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांचे जाणते राजे शरद पवारांकडं गेल्या. त्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडंही गेल्या. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Advertisement

गौरी चव्हाण डॉक्टर आहेत. त्या सुशिक्षित आहे. त्यांची अवस्था मला पाहवत नव्हती. गौरी चव्हाण यांना मी गाईड केलं. हो मी तिला मदत केली. हा अपराध असेल तर असे हजार अपराध चित्रा वाघ करेल. आज ते लेकरु आईच्या कुशीत आहे. त्यामध्ये खारीचा वाटा चित्रा वाघ यांचा आहे, याचा मला अभिमान आहे.मला त्याचा आनंद आहे. 

( नक्की वाचा : 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल )
 

एखाद्या बाईवर जर अन्याय अत्याचार होत असेल जेवढं माझ्यानं होईल, तेवढं सहकार्य मी करते आणि करत राहणार. आणि म्हणून त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि कुठं ठेवायचं ते ठेवून दे. पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. मी मदत केली म्हणून ते लेकरु आईच्या कुशीत आहे. या प्रकारचे हजार अपराध करायला मी तयार आहे. विद्या चव्हाण असे फुसके बॉम्ब सोडू नको आपल्या वयालाही शोभलं पाहिजे. 

Advertisement

विद्या चव्हाण यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकावलं,आपल्यावर आरोप करायला लावले असा आरोप त्यांनी केला. चव्हाण यांनी यावेळी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. आपल्याला बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चित्रा वाघ यांच्यावर ही कारवाई सोपवली असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.