होय मी पुन्हा आलोय! बारामतीत लागला देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स

होय मी पुन्हा आलोय त्यांच्या नाकावर टिच्चून आलोय, अशा आशयाचा फ्लेक्स बारामती मध्ये लावण्यात आलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन वरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं होतं. विरोधकांनी तर प्रत्येक क्षणाला फडणवीसांना छेडलं होतं. अगदी शरद पवारही फडणवीसांना मी पुन्हा येईन वरून डिवचत होते. महाविकास आघाडीच्या काळात असा कोणता दिवस गेला नसेल की ज्यावरून फडणवीसांना डिवचलं गेलं नाही. पण आता खरोखर फडणवीस परत आले आहेत. त्यामुळे शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजेच बारामतीत होय मी पुन्हा आलोय या आशयाचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

होय मी पुन्हा आलोय त्यांच्या नाकावर टिच्चून आलोय, अशा आशयाचा फ्लेक्स बारामती मध्ये लावण्यात आलाय. हा फ्लेक्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर बारामतीत हा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सची सध्या बारामतीत जोरदार चर्चा आहे. या वाक्यामुळेच फडणवीस हे टीकेचे धनी ठरले होते. त्यांना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.  

ट्रेंडिंग बातमी - मंत्रिमंडळ विस्तार ते शिंदे सोबतचे मतभेद! फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे

होय मी पुन्हा आलोय, त्यांच्या नाकावर टिच्चून आलोय. मराठी मातीतील पशुपालक, कामगार, शेतकरी, ओबीसी, भटके विमुक्त, कष्टकरी, वंचित, युवक, अधिकारी, महिला, विद्यार्थी, वारकरी या जनतेचा डीएनए म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आलोय. विकसित नवं महाराष्ट्र घडवण्यासाठी मी पुन्हा आलोय, मी पुन्हा आलोय अशा आशयाचा फलक भाजपचे प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी हा बारामतीतील पेन्सिल चौक आणि भिगवन चौकात लावला आहे. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.