Devendra Fadnavis on Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणारे विषय हे बैठकीपूर्वी सार्वजनिक केले जातात. माध्यमांवर चर्चा केली जाते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. यापुढे मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिंक करू नये अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
येत्या काळात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंडा लिंक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मी कारवाई करेल अशी ताकीद वजा इशारा फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणाऱ्या एका विषयाबाबत बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याबाबत प्रतिक्रिया विचारतात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
मंत्री म्हणून आपण गोपनीयतेची शपथ घेतो. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा देखील गोपनीय असतो. त्यामुळे ती शपथ आपण पाहिलीच पाहिजे असा देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. सूचना देखील फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांना दिले असल्याचा स्वतः फडणवीस यांनी जाहीर केलंय.
( नक्की वाचा : पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र )
मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा गोपनीय ठेवण्याची महत्त्वाची कारणे
1. राष्ट्रीय सुरक्षा – काही निर्णय राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असतात. माहिती लीक झाल्यास देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
2. आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय – सरकार अर्थसंकल्प, कर प्रणाली, नवीन योजना किंवा धोरणात्मक बदलांवर चर्चा करते. जर ही माहिती आधीच बाहेर गेली, तर आर्थिक बाजारावर परिणाम होऊ शकतो.
3. गोपनीयता आणि निर्णय प्रक्रिया – बैठकीत चर्चा होणाऱ्या विषयांबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वी वेगवेगळ्या मतांचे आदानप्रदान होते. जर ही माहिती बाहेर गेली, तर चुकीची अर्धवट माहिती जनतेपर्यंत पोहोचू शकते.
4. राजकीय आणि प्रशासकीय स्थैर्य – काही निर्णय संवेदनशील असतात, जे राजकीय वातावरणावर परिणाम करू शकतात. त्यामुळे निर्णय अंतिम झाल्यानंतरच त्याची अधिकृत घोषणा केली जाते.
5. गोपनियतेचे कायदेशीर बंधन – काही देशांमध्ये कायद्याने मंत्रिमंडळाच्या चर्चेची गोपनीयता राखणे आवश्यक असते. भारतातही मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातील माहिती सार्वजनिक करण्यास प्रतिबंध आहे.