'आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो...' ठाकरेंसोबतच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्यात 2019 ते 2024 या कालावधीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपाच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महायुतीला मोठं यश मिळाल्यानं राज्यात स्थिर सरकार आहे. पण, त्यानंतरही नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकसत्ता' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं आहे.

फडणवीस यावेळी म्हणाले की, 'उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. आमच्यातले संबंध कधीही समोर भेटल्यानंतर नमस्कार करता येणार नाही असे नव्हते. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. आमचे चांगले संबंध आहेत.

( नक्की वाचा : वर्षा बंगल्यावर अजून राहायला का गेले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेर दिलं उत्तर )

दक्षिण भारतात जसं नेते एकमेकांचे जान के प्यासे आहेत, तशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. त्यामुळे संवाद करायला बोलायला काही हरकत नाही. संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही पण याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत, अशी परिस्थिती नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Advertisement

राजकारणात काहीही होऊ शकतं

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य केलं होतं. 2019 ते 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यामधून मला एक गोष्ट लक्षात आली की, कोणतीही गोष्ट होणार नाही असं समजून चालायचंच नाही. काहीही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकूल नाही. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकूल नाही.ते होणं फार चांगलं आहे या मताचा मी नाही. राजकारणात हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणार नाही, असं मी म्हणतो त्यावेळी राजकीय परिस्थिती कुठं नेऊन ठेवेल याचा भरवसा नाही.' असं फडणवीस म्हणाले होते.