Devendra Fadnavis : बीडसारखाच पीक विमा घोटाळा आणखी काही जिल्ह्यात...CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारच्या पीक विमा योजनेमध्ये बीड जिल्ह्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

राज्य सरकारच्या पीक विमा योजनेमध्ये बीड जिल्ह्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला आहे. 'पीक विम्याचा परळी पॅटर्न' असा उल्लेख करत सुरेश धस यांनी महायुती सरकारमधील कृषीमंत्र्याावरच नाव न घेता टीका केली होती. धस यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर बीड सारखाच घोटाळा आणखी काही जिल्ह्यात असू शकतो, त्याचीही चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस ?

एक खूप महत्त्वाचा मुद्दा सुरेश धस यांनी निदर्शनास आणून दिला. पीक विमाच्या संदर्भात एक चांगला बीड पॅटर्न बघितला.  त्यामुळे सरकारचे पैसे वाचले. आता एक नवीन पॅटर्न त्यांनी मांडला आहे. त्याच्यामध्ये कुणाच्या तरी जमीनीवर कुणी तरी विमा काढला आहे. खरंतर विम्याची योजना सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं. बीड जिल्ह्याला पुस्कार दिला. पण, आता एक नवीन पॅटर्न बीड जिल्ह्यात तयार झाला. आहे

निश्चितपणे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते. ते ओरिजनली आमच्या गँगमध्ये होते. मग तुमच्या गँगमध्ये होते, आता आमच्या गँगमध्ये आहेत. त्याशिवाय त्यांची कोणती गँग नाही. त्यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे. आपण इतके पैसे या योजनेसाठी देतो. त्या पीक विम्यामध्ये घोटाळा होणार असेल तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. हे इथं लक्षात आलं, अजूनही काही जिल्ह्यात असू शकतं. हा करदात्यांचा पैसा आहे. त्यामधील घोटाळ्याचा निश्चितपणे छडा लावला जाईल. धस साहेब आम्ही हे प्रकरण धसास लावणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

Advertisement

( नक्की वाचा : Shinde vs Thackeray : '... हम बुके दे के घर जाते है,' दानवेंचं नाव घेत शिंदेंचे ठाकरेंवर बाण )

धस यांचे गंभीर आरोप

यापूर्वी बीड जिल्ह्यातील भाजपा उमेदवार सुरेश धस यांनी स्वत:च्याच सरकारवर नाव न घेता टीका केली.  1 रुपयांत पीक विमा म्हणून आम्ही ढोल वाजवतो…राज्याचे कृषी मंत्री त्यावेळेस कोण होते मला माहिती नाही पण गिरीश महाजन तुमच्या तालुक्यात तरी पीक विमा मिळाला का ? गोरगरिब शेतकरी पैसे कोण खाते हे चौकशी झाली पाहिजे. बंजारा तांडावर वंजारी कसे ? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

पीएम पीक विमाचा नवा परळी पॅटर्न, मी अमित शाहा, पीएम मोदी भेट घेणार नवीन परळी पॅटर्न देशात लागू करा मागणी करणार असल्याचा अशी टीका धस यांनी केली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले...)

निश्चितपणे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते. ते ओरिजनली आमच्या गँगमध्ये होते. मग तुमच्या गँगमध्ये होते, आता आमच्या गँगमध्ये आहेत. त्याशिवाय त्यांची कोणती गँग नाही. त्यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे. आपण इतके पैसे या योजनेसाठी देतो. त्या पीक विम्यामध्ये घोटाळा होणार असेल तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. हे इथं लक्षात आलं, अजूनही काही जिल्ह्यात असू शकतं. हा करदात्यांचा पैसा आहे. त्यामधील घोटाळ्याचा निश्चितपणे छडा लावला जाईल. धस साहेब आम्ही हे प्रकरण धसास लावणार आहोत.
 

Topics mentioned in this article