काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.त्याच बरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्या दृष्टीने भेटीगाठी वाढल्या आहेत. विद्यमान आमदारही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? कोणत्या पक्षाच्या तिकीटावर विजयी होता येईल? विद्यमान पक्ष उमेदवारी देणार की नाही? याची चाचपणी करत आहेत. अशा काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या दोन आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्या मुळे हे दोघे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी आज बुधवारी सकाळीच वर्षा या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत  ज्या काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटींग केली होती त्यांच्यात या दोघांचाही समावेश होता असा आरोप आहे. विधानसभेच्या तोंडावर या दोघांवर कारावईचीही शक्यता आहे. त्याबाबतची शिफारसही पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष कारवाई करण्या आधीच स्वत: पक्ष सोडण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. त्यामुळेच या दोघांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण

जितेश अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिक्त झाला होता. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यात जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हण यांचे समर्थक समजले जातात. ते अशोक चव्हाण यांच्या बरोबर भाजपमध्ये जातील अशी शक्यता होती. पण त्यांनी काँग्रेसमध्ये राहाणे पसंत केले. शरीराने ते काँग्रेसमध्ये होते पण मनाने अशोक चव्हाण यांच्या बरोबरच असल्याची चर्चा आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'लाडक्या बहिणी'साठी वर्षा गायकवाडांनी पदर खोचला, निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नवा चेहरा

अंतापूरकर यांच्या प्रमाणे हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस वोटींग केल्याचा आरोप आहे. खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील खोसकर हे एकमेव काँग्रेस आमदार आहेत. मुळचे राष्ट्रवादीचे असलेले खोसकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकी वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यात त्यांनी विजय मिळवला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच त्यांनीही जितेश अंतापूरकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Advertisement