जाहिरात

MLA Nitin Pawar: आमदाराचा त्रास, काँग्रेस पदाधिकारी असलेल्या महिलेचे टोकाचे पाऊल, प्रकरण काय?

कळवणचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी दाखल करतात, असा आरोप शीतल महाजन यांनी केला आहे.

MLA Nitin Pawar: आमदाराचा त्रास, काँग्रेस पदाधिकारी असलेल्या महिलेचे टोकाचे पाऊल, प्रकरण काय?
नाशिक:

काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं घडली आहे. शीतल महाजन असं त्यांचं नाव आहे. कळवणचे आमदार नितीन पवार आणि त्यांच्या पत्नी जयश्री पवार या सतत त्रास देत असल्याने आपण हे पाऊल उचललं असल्याचं शीतल यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आमदार पवार यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. नितीन पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कळवणचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी  दाखल करतात. त्यातून ते नेहमी त्रास देत आले आहेत. शिवाय ग्रामसेवक असलेल्या पतीला ही त्रास देतात, असा आरोप शीतल महाजन यांनी केला आहे. शीतल या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कळवणमध्ये ही घटना घडली.  

ट्रेंडिंग बातमी - Narendra Modi: गोधरा दंगलीबाबत मोदी थेट बोलले, फ्रिडमन यांच्या मॅराथॉन पॉडकास्टमध्ये मोठे खुलासे

आत्महत्येचा प्रयत्न करण्या पूर्वी शीतल महाजन यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक असलेल्या पतीला त्रास दिला जात आहे. त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.  मात्र अनेक वेळा चौकशी होऊनही त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही त्रास सुरूच होता, असं ही त्या सांगतात. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Maitri Club: वय वर्ष 60 तरी ही बांधली जातेय लग्नगाठ, 'त्या' 90 जणांची अनोखी कहाणी

आता तर आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू  योगेश गायकवाड यांनी केला आहे. तसा तक्रार अर्ज त्यांनी अभोणा पोलिस स्थानकात दाखल केला आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 90 सैनिक ठार झाल्याचा BLA चा दावा

 दरम्यान याबाबत आमदार नितीन पवार यांच्याशी फोनवरून NDTV मराठीच्या प्रतिनिधीने संपर्क साधला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी, संबंधित महिलेच्या पति विरोधात मी लक्षवेधी टाकलेली आहे. घरकुल प्रकरणात त्यांनी गैरव्यवहार केला आहे हे आपण लक्षवेधीत म्हटलेलं आहे. मी कोणताही दबाव वगैरे किंवा त्रास त्या महिलेला दिलेला नाही, असे स्पष्टीकरण आमदार  नितीन पवार यांनी दिले आहे. पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: