हरियाणा विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला कानपिचक्या देत खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार आहे. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे असे सामनाच्या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहे. हरियाणात काँग्रेसने ‘आप'सह अनेक घटकांना दूर ठेवले. कारण सत्तेत त्यांना वाटेकरी नको होते. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया' आघाडीचा विजय झाला. हरयाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी'साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला सुनवाले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याच अग्रलेखात मोदी आणि शहा यांनाही लक्ष करण्यात आले आहे. मोदी व शहा यांनी हरियाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये असे म्हटले आहे. कारण महत्त्वाचे राज्य असलेल्या जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही. महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे, असे सुचितही करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?
हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे. हरियाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते. पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरियाणात भाजपविरोधी वातावरण होते. भाजपच्या मंत्र्यांना व उमेदवारांना हरयाणातील गावात घुसू देत नाहीत असा माहोल होता. तरीही हरियाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले. असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर अन् खंडाळ्यात एन्काऊंटर' सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे
त्याच वेळी जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले व भाजपच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या उडवल्या. कश्मीरातील जनता मोदी-शहांनाच मतदान करेल असे ढोल वाजवले जात होते. पाच वर्षांपूर्वी 370 कलम हटवून अमित शहांनी जणू क्रांतिकारक पाऊल टाकल्याचे जाहीर केले. कश्मीरातून 370 कलम हटवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार केल्याचा आव मोदी-शहा आणत होते. पण कश्मीरातील दहशतवाद त्यांना संपवता आला नाही. तरुणांना रोजगार देण्यात मोदी-शहा तोकडे पडले. मुख्य म्हणजे, हजारो कश्मिरी पंडितांची घरवापसी मोदी-शहा करू शकले नाहीत. 370 कलम काढणे हा फार्स ठरला. आता तेथील जनतेने भाजपचा पराभव केला. हरियाणात काँग्रेस व जम्मू-कश्मीरात भाजपला अशातऱ्हेने धक्का बसला.
ट्रेंडिंग बातमी - त्याला मारावी लागली धावत्या गाडीतून उडी, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का?
हरियाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल'वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही ‘वाटा' आहेच. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी कसा सुटतो? याआधीच्या निवडणुकांतही बाबा राम रहीमचे हे‘निवडणूक कनेक्शन' दिसून आले होते. निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, “भाजपच जिंकेल. आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे.' सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली. पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली व काँग्रेस पिछाडीवर गेली.
हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल असा विश्वास सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे. मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे असे ही यात म्हटले आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे. असा सल्लाही देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world