विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या महायुतीत जोरदार पणे सुरू आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर राज्यातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोकणात भाजप मोठी तडजोड करण्याच्या तयारीत आहेत. कोकणात जागा वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप देण्याचा जवळपास निर्णय झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जागा या शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या पदरात केवळ एक जागा जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या वाट्यालाही एक जागा येणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे पाच विधानसभा मतदार संघ येतात. तर सिंधुदुर्गात सावंतवाडी, मालवण आणि कणकवली हे तीन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण आठ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील सहा मतदार संघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा आहे. त्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, मालवण या मतदार संघाचा समावेश आहे. यातील कोणताही मतदार संघ सोडण्यास एकनाथ शिंदे तयार नाहीत.
ट्रेंडिंग बातमी - 'दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर अन् खंडाळ्यात एन्काऊंटर' सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे
शिंदे यांच्या या आग्रह पुढे भाजपनेही नमते घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप या दोन्ही जिल्ह्यात केवळ कणकवली मतदार संघातून आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. नितेश राणे हे सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. ही एकमेव जागा भाजपच्या पदरात जात आहे. तर चिपळूणची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. भाजपने गुहागरच्या जागेवरही दावा केला आहे. मात्र ही जागा शिवसेनेची असल्याने ती सोडण्यास शिंदे गट तयार नाही. या मतदार संघातून डॉ. विनय नातू हे तयारीलाही लागले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: शरद पवारांनाचा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का
जर जी चर्चा आहे त्यानुसार जागा वाटप झाले तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. लोकसभेला भाजपला कोकणात यश मिळूनही आता माघार का असा प्रश्न केला जात आहे. दापोली मतदार संघात तर रामदास कदम यांच्या मुलाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर विरोध केला आहे. तर गुहाघरमध्येही विनय नातू यांनी जोरदार तयारी चालवली आहे. अशा वेळी अचानक माघार कशी घेणार असा प्रश्न आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय समोर ठेवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - प्रहारचे राजकुमार पटेल शिंदेंच्या सेनेत कसे गेले? मोठा गौप्यस्फोट
सिंधुदुर्गमध्ये ही कुडाळ मालवण विधानसभेची जागा भाजपला हवी आहे. इथून नितेश राणे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र एकनाथ शिंदे ही जागा सोडण्याच्या तयारीत नाहीत. त्यांनी नितेश राणे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढावी अशी ऑफर दिली आहे. तसे झाल्यास राणे यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे लागेल. त्यामुळे ती जागाही भाजपला मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world