राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून वाद चव्हाट्यावर, थेट शरद पवारांची मध्यस्थी

पक्षातील एक वाद शरद पवार यांच्या समोर आला आहे. तो वाद मंत्रिपदाबाबतचा आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यात शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या ते राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशा वेळी पक्षातील एक वाद त्यांच्या समोर आला आहे. तो वाद मंत्रिपदाबाबतचा आहे. मंत्रीपद एक आणि इच्छुक दोन अशी स्थिती आहे.  त्यामुळे पक्षातील दोन नेत्यांचा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. याची थेट दखल शरद पवारांनी घेतली असून हा वाद सोडवण्यासाठी दोन ही नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. यातून चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सध्या केरळमध्ये डाव्या पक्षां बरोबर सत्तेत आहे. इथे शरद पवार गटाचे ए.के. ससेंद्रन हे मंत्री आहेत. केरळ विधानसभेत शरद पवार गटाचे दोन आमदार आहेत. थॉमस हे दुसरे आमदार आहेत. ज्या वेळी सत्ता स्थापन झाली त्यावेळी ससेंद्रन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्याच वेळी थॉमस यांना अडीच वर्षानंतर मंत्री केले जाईल असे आश्वासन दिले होते. पण अडीच वर्षानंतरही त्यांना मंत्री करण्यात आले नाही. 

ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप

मंत्री न केल्याने सध्या थॉमस हे कमालीचे नाराज आहेत. ए.के.ससेंद्रन यांच्या जागी मंत्री म्हणून आपली नियुक्ती केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पक्षाने आपल्याला तसा शब्द दिला होता असे ही त्यांनी सांगितले आहे. तो शब्द आता पाळावा असेही ते म्हणाले. अजूनपर्यंत पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. यावर आता केरळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष चाको यांनी तोडगा काढण्याचे ठरवले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - नाव "प्रेम" पण इंस्टावरच्या भयंकर चाळ्यांमुळे 'असा' झाला गेम

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चाको हे दोन ही आमदारांसह मुंबईत आले आहेत. त्यांनी याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांना कल्पना दिली आहे. शरद पवारांनी यावर तोडगा काढण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार या सर्वांची बैठक चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेही उपस्थित राहाणार आहेत. यावर निश्चित तोडगा निघेल असा विश्वास केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष चाको यांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर केरल राष्ट्रवादीतील दोन ही आमदारांनी शरद पवारां बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठींबा दिली. पक्षाचे दोन आमदार असल्याचे एकाला मंत्रीपदाची संधीही देण्यात आली. सध्या केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार असून त्यांच्याकडे 91 आमदारांचे पाठबळ आहे. त्यात राष्ट्रवादीच्या या दोन आमदारांचाही समावेश आहे.