जाहिरात

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर, खडसेंनीही शब्द दिला, जळगावमध्ये काय घडलं?

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांना जमीन घोटाळा प्रकरणी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर, खडसेंनीही शब्द दिला, जळगावमध्ये काय घडलं?
जळगाव:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फुट पडली. त्यावेळी खडसे हे शरद पवारांबरोबर राहीले. पणनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. दिल्लीतील पक्षश्रेष्टींच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असं सांगितलं गेलं. आज उद्या आज उद्या करत  तो दिवस कधी आलाच नाही. शेवटी त्यांनी शरद पवारां बरोबर राहाण्याचं ठरवलं. आता त्यांना पुन्हा एक ऑफर आली आहे. त्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात एकीकडे शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. असं असताना जळगाव मध्ये जिल्हा बँकेच्या बैठकीत सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एकनाथ खडसें यांना चुचकारलं आहे. अशा गोष्टी सर्वां समोर नाही तर खाजगीत बोलल्या जातात असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 'लेकीच्या मृत्यूनंतर ही तिच्यावर शिंतोडे का?', वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले

मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या ऑफरला दुजोरा ही दिला आहे. सहकार मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ खडसे यांनीही त्यावर प्रतिक्रीया दिला आहे. ते म्हणाले जर शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर आपण ही  त्यांच्या बरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ अशी प्रतिक्रीया दिली आहे. असा आपण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना देत आहोत असं ही खडसे यावेळी म्हणाले. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत येण्याची अमोल मिटकरींनी ही आपल्याला ऑफर दिली होती असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane:'वैष्णवीची आधी दोन लग्न तुटली',काय होतं कारण? वडीलांनी काय सांगितलं?

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांना जमीन घोटाळा प्रकरणी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खटके ही त्यातून उडत होते. अनेक वेळा खडसे यांनी आपल्याच सरकारवर टीका केली. शेवटी खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. मात्र त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर त्यांना घरवापसीचे वेध लागले. दिल्लीत त्यांनी गाठीभेटी घेतल्या. पण त्यांचा भाजप प्रवेश होवू शकला नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com