देवा राखुंडे, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातल्या दौंड नगरपालिकेच्या (Dound Nagarparishad) आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील गोंधळामुळे आज (शनिवार, 25 ऑक्टोबर) मोठा गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रवक्त्या वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) आणि वीरधवल जगदाळे (Virdhaval Jagdale) यांनी मतदार यादीत कोणतीही पूर्वसूचना न देता नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्याबद्दल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना (Chief Officer) जाब विचारत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
काय आहे नेमका प्रकार?
दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेत, कोणतीही पूर्वसूचना न देता मतदार यादीतील नावे अन्य प्रभागात का टाकण्यात आली, असा थेट सवाल मुख्याधिकाऱ्यांना विचारला.
( नक्की वाचा : Pune News: मोहोळांची संपत्ती 400 पट वाढली? 'पांढऱ्या इनोव्हाचा उल्लेख करत धंगेकरांचा नवा बॉम्ब, पुण्यात खळबळ )
यावेळी वैशाली नागवडे यांनी गंभीर आरोप केला की, "निवडणूक आयोगाच्या नियमांच्या बाहेर जाऊन दौंड नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी 'बल्क स्वरूपात' तक्रारदारांचे नाव बदलीसाठीचे अर्ज स्वीकारले. आणि नियमाचे उल्लंघन करत, मनमानी पद्धतीने यात बदल केले जात आहेत." या कथित मनमानीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.

दोन गट आमने-सामने
या आंदोलनामुळे नगरपालिकेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करत असताना, दुसरीकडे याचवेळी मुख्याधिकारी यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षातील काही लोक एकत्र येऊन घोषणाबाजी करताना दिसले. त्यामुळे दौंड नगरपालिकेत एकाच वेळी दोन राजकीय गट आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world