Baramati News: सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, पण 'त्या' बॅनरने अनेकांची झोप उडवली, "अतितदादा पवार.."

अनेक ठिकाणी सुनेत्रा पुवारांच्या विजयाचा गुलाल उधळला आहे. पण, एका बॅनरची मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sunetra Pawar Baramati BY Election 2026 News
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Baramati Sunetra Pawar Viral Banner : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सुनेत्रा पवारांना विक्रमी मातधिक्य मिळालं आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या विजयाचा गुलाल उधळला आहे. पण, एका बॅनरची मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. बारामतीमध्ये विशाल पोपटराव जाधव मित्रपरिवारकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बारामती शहरातील क्रीडा संकुल शेजारील चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर लिहिलेलं मजकूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

"निवडणूक आज असो, पाच वर्षांनी असो, वा 10 वर्षांनी..आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल,आदरणीय वहिनी साहेब अभिनंदन",असा मसेजे या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत 58 टक्के मतदान झालं होतं.

सुनेत्रा पवारांना एकूण किती मतं मिळाली?

एकूण 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.मतमोजणी प्रक्रिया आज बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 22 उमेदवार होते.मात्र सुनेत्रा पवार यांच्यासमोर या 22 अपक्ष उमेदवारांचा निभाव लागला नाही.या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना तब्बल 2 लाख 18 हजार 930 मते  मिळवत भारतात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड केला.तर समोरच्या बावीस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केलं.

Advertisement

नक्की वाचा >> Vijay Thalapathy  Net Worth: देशातील राजकारणात फक्त विजय थलापतीची चर्चा, स्टार अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 22 उमेदवार आखाड्यात, पण..

अतिशय भावनिक वातावरणात बारामतीची पोटनिवडणूक पार पडली.प्रचाराचा शुभारंभ आणि प्रचाराची सांगता सभा वगळता कोणतीही जाहीर सभा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली नाही.तर या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणताही उमेदवार देण्यात आला नव्हता. सुनेत्रा पवार यांच्यासमोर 22 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. मात्र यात राष्ट्रीय पक्षाचा किंवा प्रादेशिक पक्षाचा एकही उमेदवार नव्हता. 

या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्याला मतरुपी श्रद्धांजली अर्पण करायचे आहे, असं आवाहन सुनेत्रा पवार यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यास बारामतीकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं या मताधिक्यातून पाहायला मिळत आहे.अजित पवार यांच्याप्रती असलेल्या निष्ठेचा भाग म्हणून या ऐतिहासिक निकालानंतर विशाल जाधव मित्रपरिवाराकडून ही बॅनरबाजी करण्यात आली.बारामतीकरांची निष्ठा कायम त्याच्या सोबत राहील ज्याच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.