Thalapathy Vijay Net Worth : अभिनयाच्या जोरावर बॉक्स ऑफिससह सिनेविश्वात छाप टाकणारे विजय थलापती आता राजकीय मैदानातही मोठे खेळाडू बनले आहेत. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष तमिळगा वेत्री कळघम (TVK) तगडं यश मिळालं आहे. यामुळे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्हीके पार्टीच्या सर्वाधिक 110 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे विजय थलापती मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विजय थलापतीकडे एकूण संपत्ती किती आहे?असा सवालही सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. विजय थलापती किती कोटींचा मालक आहे आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोट्यावधींची जंगम आणि स्थावर संपत्ती
विजयने निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्याची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. ही आकडेवारी अनेकांना थक्क करणारी आहे. विजय थलापतीकडे एकूण 603.20 कोटींची संपत्ती आहे.
जंगम संपत्ती : 404.58 कोटी
स्थावर संपत्ती : 198.62 कोटी
फक्त वर्ष 2024-25 मध्ये विजयने 184.53 कोटी रुपयांची तगडी कमाई केली होती. यामुळे विजय देशातील महागड्या एक्टर-पॉलिटिशयनच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
नक्की वाचा >> Baramati Result: सुनेत्रा पवारांनी इतिहास रचला! बारामतीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय; 22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
बँक बॅलेन्स आणि लग्झरी गाड्यांची आवड
विजयच्या श्रीमंतीच्या अंदाज त्यांच्या बँक बॅलेन्सने लावला जाऊ शकतो. त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात 213 कोटींहून जास्त रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे BMS कार, लेक्सस आणि टोयोटा वेलफायरसारख्या महागड्या गाड्या आहेत.
पत्नीसोबत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक
विजयने त्याची पत्नी संगीताच्या नावावरही संपत्ती जाहीर केली आहे. संगीताकडे जवळपास 15.76 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर संपत्ती आहे.याशिवाय विजयने चेन्नईत कमर्शिएल आणि रेसिंडेन्शिएल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे.तसच कोडाईकनालमध्ये त्यांच्याकडे शेतजमीन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world