विधानसभेत नेहमीच आपण गदारोळ, खडाजंगी पाहात असतो. विधानसभेत सत्ताधाऱ्यांना तर कधी सत्ताधारी विरोधकांनाही भिडत असतात. एकमेकांवर कुरघोडी, राजकीय आरोप -प्रत्यारोप याने विधानसभा दणाणून जाते. पण आजचं चित्र थोडं वेगळं होतं. आज विधानसभेत चर्चा झाली ती माकडं आणि कुत्र्यांवर... ऐकायला कसं तरीच वाटत असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताचा असणाऱ्या या गंभीर विषयावर सभागृहात गंभीर चर्चा झाली. भाजपच्या रणधीर सावरकर यांनी माकडांची समस्या लक्षवेधी द्वारे मांडली. तर भाजपच्याच मनिषा चौधरी यांनी श्वानांचा होणारा त्रास यावर पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन द्वारे हा प्रश्न मांडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेत माकडांच्या त्रासाचा प्रश्न गाजला
राज्यात बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडं कमी झाली आहे. वन्यप्राणी नागरी वस्तीत घुसत आहेत. अकोला जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला आहे. नापिकी आणि किटकनाशकां पेक्षा वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान हे मोठे आहे ही बाब भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी निदर्शनास आणली. अकोल्या माकडांचा त्रास मोठा आहे असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकडां बरोबर डुक्कर, हरीण याचा ही मोठा त्रास होत आहे. माकडांचा बंदोबस्त तातडीने झाला पाहीज असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात माकडांचा त्रास वाढल्याने त्यांना मारण्याची परवानगी देण्यात आली. हरियाणात माकडांना मारता येत नाही. पण इंजेक्शन देवून त्यांची नसबंदी केली जाते. त्या पद्धतीने काही करता येईल का असेही सावरकर यांनी सभागृहात सांगितले. ते नाही तर झटका मशिन तरी उपलब्ध करून द्या असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठा त्रास असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर कायची उपाययोजना होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
पावसाळ्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. ही बाब आमदार मनिषा चौधरी यांनी उपस्थित केली. गेल्या ३ दिवसात दहीसर विधानसभेत 37 लोकांना भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची पाहणी करावी. ज्या ३ लोकांना कुत्रे चावलेत त्यापैकी एका महिलेच्या पायाचा लचका तोडल्याचे त्यांनी सांगितले. प्राणीप्रेमी या भटक्या कुत्र्यांना खायला घालतायत. तीच कुत्री सोसायटीतील लोकांवर हल्ले करत आहेत असेही त्यांनी सांगितले. प्राणीप्रेमींनी एखादे श्वानगृह तयार करावे आणि तेथे या कुत्र्यांना न्यावे आणि खायला घालावे. महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष द्यावे असा मुद्दा आमदार मिनिषा चौधरी यांनी उपस्थित केला.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ
सरकारचं उत्तर काय?
या चर्चेला सरकारनेही उत्तर दिले आहे. ही बाब गंभीर असून त्याची दखल सरकारने घेतली आहे असे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. त्यानुसार तातडीने कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान ही बाब शेतकरी आणि सर्व सामान्यांशी जोडलेली आहे. त्यामुळे सरकार याबाबत जी काही कारवाई करेल त्याची माहिती त्यांनी सदनाला द्यावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.