![Delhi Election Results 2025: मतमोजणी किती वाजता सुरू होणार? कुठे पाहाल अचूक निकाल? Delhi Election Results 2025: मतमोजणी किती वाजता सुरू होणार? कुठे पाहाल अचूक निकाल?](https://c.ndtvimg.com/2025-02/co4mk6jo_delhi-election_625x300_07_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीता निकाल शनिवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतदानानंतर सर्व मतदान यंत्र हे जवळपास 70 वेगवेगळ्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. या ईव्हीएमवर 24 तास सीसीटीव्हीची नजर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजप या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवरिल मतमोजणी सकाळी 7 वाजता सुरू होईल. सर्वात आधी पोस्टल मतमोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल. संध्याकाळी सहापर्यंत सर्व जागांवरचे निकाल हाती येतील. दिल्लीत जवळपास 1.5 कोटी मतदार आहेत. या वेळी दिल्ली विधानसभेसाठी जवळपास 60.42% मतदान झाले आहे. दिल्लीकरांचा मतदानाला मिळालेला प्रतिसाद पाहाता भाजप आणि आपने विजयाचा दावा केला आहे.
दिल्ली विधानसभेचा निकाल निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईडवर पाहाता येणार आहे. शिवाय NDTV मराठीच्या https://marathi.ndtv.com/ वेबसाईडवर ही सर्वात जलद आणि अचूक निकाल पाहाता येणार आहेत. प्रत्येक मतदार संघाचा निकाला तुम्ही या वेबसाईटवर पाहू शकता. शिवाय कुणाला किती आघाडी मिळाली आहे याची माहिती ही या वेबसाईडवर मिळेला.
मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शिवाय ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणीही तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाज यांनी सांगितले आहे. ईव्हीएमवर चोविस तास सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवार आणि त्यांचे निवडणूक एजंट यांना अडचण येणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. ज्यावेळी स्टाँग रूम उघडले जातील त्यावेळी व्हिडीओग्राफी केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world