गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तर टीका होतच आहे पण सरकारचीही बदनामी होत आहेत. या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी ही दबाव वाढत आहे. विरोधक तर त्यासाठी आक्रमक झालेले दिसतात. जनतेतही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी आहे. अशा स्थिती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ही कोंडी झाली आहे. अशा स्थितीत फडणवीसांनी अशा वादग्रस्त मंत्र्यांना चांगलच झापलं असल्याचं समोर आलं आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे मंत्री आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांची वक्तव्ये ही वादग्रस्त ठरत आहेत. शिवाय ती सरकारसाठीही अडचणीची ठरत आहेत. अशा वेळी त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव येत आहे. त्यात हे मंत्री शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे फडणवीसांना त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही मर्यादा येत असल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी फडणवीसांनी मात्र या मंत्र्यांचा समाचार घेतल्याचं समजत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना चांगलेच झापले आहे. या सर्व मंत्र्यांची त्यांनी कानउघडणी केली आहे. जरा कमी बोलायला शिका, जितके कमी बोलाल तितके चांगलं आहे असा मोलाचा सल्लाही या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शिवाय या पुढेही तुम्ही असेच वादग्रस्त वक्तव्य करत राहीलात तर दरवेळी तुम्हाला कुणी वाचवणार नाही असा सज्ज्ड दमही त्यांनी यावेळी दिला आहे. तुम्ही विनाकारण विनाकारण माध्यमां समोर वाद निर्माण होणारे वक्तव्ये करू नका असं ही फडणवीसांना या मंत्र्यांना सांगितल्याचं समजत आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटले होते. शिवाय ते रम्मी खेळतानाही दिसले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यांनी आपल्या राज्यमंत्र्याबरोबरही अधिकारावरून वाद घातला होता. तर गोगावले यांनी थेट राणेंनी मर्डर कसे केले आहेत हे जाहीर पणे सांगितले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांनी ते अडचणीत आलेच होते पण सरकारला ही त्याची झळ पोहोचत होती.