Dhule News: धु्ळ्यातही 'ऑपरेशन टायगर', ठाकरे गटाला धक्का, महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhule Shubhangi Patil Joins Shivsena

नागिंद मोरे, प्रतिनिधी 

Dhule Political News : राज्यात ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.धुळ्यातील ठाकरे सेनेच्या उपनेत्या आणि उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कप्रमुख शुभांगी पाटील या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (शिंदे गट)जाहीर प्रवेश करणार आहेत.खासदार फुटीच्या राजकीय घडामोडींनंतर धुळ्यातील हा ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शुभांगी पाटील या आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट)प्रवेश करणार आहेत.यामुळे धुळे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या "ऑपरेशन टायगर"च्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असूनधुळे आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Maharashtra Rain: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, घराबाहेर जाणाऱ्यांनी या तारखांना राहा अलर्ट

"साहेबांबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही"

गेल्या काही दिवसांपासून शुभांगी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला त्यांनी या चर्चांचे खंडन केले होते. मात्र आता त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत बोलताना त्या म्हणाल्या,"उद्धव ठाकरे साहेबांबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही.मात्र हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे".

नक्की वाचा >> Nashik News: नाशिककरांनो, आताच सावध व्हा, 'या' भागात फिरतायत एक नव्हे दोन बिबटे, थक्क करणारा व्हिडीओ

अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले होते.त्यानंतर सचिन अहिर यांनीही पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला आणि विधानपरिषदेचे उपसभापती झाले.या घडामोडींनंतर राज्यात ‘ऑपरेशन टायगर'पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान,विकासनिधी आणि स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण काही पक्षांतर केलेल्या नेत्यांनी यापूर्वी दिले होते.शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशा नंतर धुळे जिल्ह्यातील ठाकरे गटातील आणखी काही नेते आगामी काळात शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील का,याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.