लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे यांनी दिली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी ठाकरे गटामध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं उघड झालं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवारी (24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं हा बंद बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविकास आघाडीला काही तास आधी बंद मागे घ्यावा लागला.
महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडाला काळी फित लावून बदलापूर प्रकरणाचा निषेध करणारं आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं झालेल्या आंदोलनात पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं दिसलं.
( नक्की वाचा : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? ठाकरे गटाची नवी भूमिका, युती काळाची होईल आठवण! )
उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आज संभाजीनगर शहरात ठाकरे गटाकडून क्रांती चौकात तोंडाला काळी फित बांधून आंदोलन करण्यात आले. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. तर. खैरे यांनी त्यांचं वेगळं आंदोलन संभाजीनगरच्या शिवसेना भवनसमोर केलं. त्यामुळे पुन्हा एकदा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादाची चर्चा पाहायला मिळत आहे. तर मला आंदोलनाबाबत सांगण्यात आले नव्हते, मला एकटा पाडण्याचे प्रयत्न करतात पण मी वस्ताद असल्याचे खैरे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world