विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे. अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चाचपणी पक्षात केली जात आहे. त्यात काही नावं पुढे येत आहे. अशा वेळी तरूण चेहऱ्याला संधी दिली जावी असा एक मत प्रवाह आहे. शिवाय संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणारा नेता असावा असंही बोललं जात आहे. शिवाय पटोले हे ओबीसी होते. यावेळी मराठा समाजाच्या नेत्याला संधी दिली जावी यासाठी आग्रह होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव जर कोणाचे असेल तर सतेज पाटील यांचे आहे. सतेज पाटील हे कोल्हापूरचे असून सध्या विधान परिषदेवर आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. या निमित्ताने काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करताना सतेज पाटील यांचे नाव समोर आले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व गुणांसोबत , सामाजिक समीकरण देखील चर्चिले जात आहे. त्यात नाना पटोले हे ओबीसी कुणबी समाजाचे आहेत. तर बंटी पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला राज्याचे अध्यक्ष पद दिले तर एक चांगला संदेश जाईल असे, काँग्रेस आमदार बोलत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले
दरम्यान नागपुरात काँग्रेसभवन येथे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी एकास एक संवाद साधला. ही फक्त गटनेता निवडीची बैठक नसून पक्षाचा गट नेता कोण असावा, याशिवाय प्रदेशाध्यक्ष कोण असावा याबाबत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी विषयी निवडणुकी दरम्यान काय तक्रारी किंवा सल्ले आहेत ते ही चेन्नीथला जाणून घेत आहेत. पक्षाच्या नेत्यांकडून केवळ फीडबॅक घेतली जाते आहे. चेन्नीथला या संवादातून निघालेली आपली माहिती आणि निष्कर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शीर्ष नेत्यांपुढे ठेवतील. त्यानंतर नावांची घोषणा होईल.
प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच काँग्रेसचा विधानमंडळ पक्षनेता आणि गटनेताही निवडला जाणार आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. गटनेता पदासाठी नाना पटोले आणि विजय वेडट्टीवार यांच्या रस्सीखेच आहे. तर नितीन राऊत यांनाही संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. तर प्रदेशाध्यपदासाठी सतेज पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांनाही संधी दिली जावू शकते. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात या जेष्ठ नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्याही नावाचा विचार होवू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world