- कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संपूर्ण ताकद झोकली आहे
- सतेज पाटील यांनी एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर 40 लाखांची लाच घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला
- व्हिडीओमध्ये आमदाराने एका तरुणाकडून 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे
विशाल पुजारी
Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिका निवडणूक चुरशीची होत आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी संपूर्ण ताकद या निवडणुकीत झोकली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यातच सतेज पाटील यांनी आपल्या एक्स पोस्ट वरून एक व्हिडीओ बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या निवडणुकीत एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. या व्हिडीओत एक सत्ताधारी पक्षाचा आमदार 40 लाखांची लाच घेताना दिसत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय तो आमदार कोण याची चर्चाही सुरू झाली आहे.
कोल्हापुरातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारावर 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ एक्स पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली आहे. Is this true? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओ ला दिलं आहे. या व्हिडीओतून कोल्हापुरातील आमदाराने एका तरुणाकडून चाळीस लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय याचा भांडाफोड एका नागरिकानेच केला आहे. वेळीच हे पैसे परत द्यावेत असं ही तो विनंती करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून एखाद्या आमदारांवर असा आरोप झाल्यास त्याची सत्यता आणि पडताळणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त केलं आहे. असं म्हणत त्यांनी एका दगडता दोन पक्षी मारले आहेत. अशा प्रकारमुळे लोकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. या व्हिडिओला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग करून त्याचा ताबडतोब खुलासा होणं आवश्यक असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं.
या व्हिडीओतील व्यक्ती ही तो आमदार कोण आहे याची हिंट देत आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहीजे असं सांगत आहे. मात्र या व्हिडीओने कोल्हापुरातलं वातावरण मात्र तंग झालं आहे. महापालिका निवडणुकीत प्रचार ऐन रंगात असताना हा व्हिडीओ बाहेर आला आहे. याचे पडसाद निवडणुकीत उमटणार हे नक्की आहे. मात्र चाळीस लाख घेणारा हा आमदार कोण याची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.
Is this true?@Dev_Fadnavis @mieknathshinde @vishwasnp @lokmat @SakalMediaNews @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @pudharionline @TV9Marathi https://t.co/j07s1W8I0k
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 12, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world