जागा वाटपाबाबत मविआमध्ये हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआची पुढची रणनिती काय असावी यावर चर्चा झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपाची खलबतं सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षा किती जागा लढणार याची चर्चा करत आहेत. आता महाविकास आघाडीतही प्रत्यक्ष जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआची पुढची रणनिती काय असावी यावर चर्चा झाली आहे. शिवाय प्रत्यक्ष जागा वाटपाची बोलणी कधी करायची हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तारीख आणि जागा ही निश्चित झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावू उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआच्या जागा वापची चर्चा सुरू झाली पाहीजे यावर बोलणी झाली. दोन्ही नेत्यांनी लवकर जागा वाटप झाले पाहीजे यावर सहमती दर्शवली आहे. त्यानुसार 7 ऑगस्टला जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईत होईल. या बैठकीला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहातील अशी माहिती थोरात यांनी भेटीनंतर दिली.   

ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'

या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणारच आहे. याशिवाय या पुढचा मविआचा अजेंडा काय असेल याचीही रणनिती आखली जाणार आहे. महायुतीची रणनिती काय असेल त्याला कशा पद्धतीने तोंड द्यावे लागेल याचाही आढावा घेतला जाईल. शिवाय महाविकास आघाडीमध्ये जे समन्वयक आहेत त्याची ही बैठक मुंबईत असेल. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या बरोबरही फोन वरून चर्चा झाल्याचं थोरात यांनी सांगितलं.