जाहिरात

Dombivli News: भाजपला धक्का! 'या' नेत्याने दिला पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा

विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत. शिवाय वारंवार आपल्याला डावलले जात असल्याची त्यांनी भावना आहे.

Dombivli News: भाजपला धक्का! 'या' नेत्याने दिला पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा
डोंबिवली:

अमजद खान 

एकीकडे अनेक नेते आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रेवश घेत असताना डोंबिवलीत मात्र उलटं घडलं आहे. इथं भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत. शिवाय वारंवार आपल्याला डावलले जात असल्याची त्यांनी भावना आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जो कोणी मला सन्मान देईल. मी त्यांच्यासोबत जाणार आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विकास म्हात्रे हे भाजपचे जेष्ठ नगरसेवक आहेत. त्याच्या पक्ष सोडण्याने भाजपला हा धक्का मानला जात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता कोणत्या पक्षात जायचं याबाबत म्हात्रे पुढील दोन तीन दिवसात निर्णय घेणार आहे. तर विकास म्हात्रे हे भाजपमध्येच आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू  असे विधान भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. बुधवारी संध्याकाळी कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला होता. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आज गुरुवारी डोंबिवलीत भाजपला धक्का बसला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?

भाजपचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. प्रभागासाठी निधी मिळत नाही. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात मला डावलले जाते. या मुळे हे पाऊल मी उचललेले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. 2 ते 3 दिवसात मी काय करणार आहे. तो निर्णय तुम्हाला कळेच असे विकास म्हात्रे म्हणाले. त्यामुळे ते कोणच्या पक्षात जाणार याची उत्सुकता डोंबिवलीकरांना आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pandharpur Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान, वारकऱ्यांची तुडूंब गर्दी

म्हात्रे शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विकास म्हात्रे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या बाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष परब यांनी सांगितले की, विकास म्हात्रे आमच्या पक्षात आहेत. ते आमचे नेते आहेत. ते कुठे जाणार नाहीत. आम्ही त्यांची समजूत काढू. उद्या नंदू परब हे म्हात्रे यांच्या भेटीला जाणार आहे. परब यांचा दावा आहे की, विकास म्हात्रे हे भाजपमध्येच राहणार आहेत. त्यामुळे पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com