जाहिरात

Dombivli News: पलावा पुलावरून राजकारण तापले, आजी माजी आमदार आमने- सामने ठाकले

पुलाच्या उद्घाटन करणाऱ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने पोलिस उपायुक्तांकडे तक्रार करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

Dombivli News: पलावा पुलावरून राजकारण तापले, आजी माजी आमदार आमने- सामने ठाकले
डोंबिवली:

अमजद खान 

कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा पूलावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे नेते  राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी केली. पूलाच्या कामात त्रूटी काय आहेत. हे दाखवून दिले. पूलाचे काम पूर्ण नाही. ठेकेदाराने हा पूल संबंधीत प्रशासनाला अद्याप हँड ओव्हर केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाई घाईने हा पूल वाहतूकीसाठी खुला केला. या प्रकरणात  एसीबीकडे  तक्रार केली पाहिजे, असे ते म्हणाले. या पूलाच्या लागून असलेल्या दुसऱ्या पूलाची आलायमेंट चेंज करण्यात आली आहे. हा देखील त्यांनी दाखवून दिले. दरम्यान हा पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरु केला आहे. विरोधकांनी काय बोलायचे हे त्यांनी ठरवावे. आम्ही विकासाच्या कामातून टिकेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चार वर्षापूर्वी एका पूलाचे काम सुरु केले. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील त्याचे उद्घाटन थांबविले होते. पलावा पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. चार वर्षापूर्वी या पूलाचे गर्डर लॉन्चिंग केले. तेव्हा फटाके फोडले होते. याचे उद्घाटन त्यांनी अशा प्रकारे केले नसते का ? भिती पोटी  घाईने हा पूल वाहतूकीसाठी सुरु केला आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने याठीकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यांनी लवकरात लवकर या पूलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Kolhapur News: म्हशी घेण्यासाठी बापाने साठवले 7 लाख, पण 'फ्री फायर' गेमवर लेकाने उडवले 5 लाख

पुलाच्या उद्घाटन करणाऱ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने पोलिस उपायुक्तांकडे तक्रार करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.  ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ही मागणी केली आहे. या वर मनसे नेते पाटील यांनी सांगितले की, पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी. याच्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारीची चौकशी  करण्यात यावी. तेव्हा या पूलाच्या कामातील काळंबेरं बाहेर येईल, असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: 'तुम्हाला कोण ओळखतं, तुमची लायकी तर...', ठाकरेंनी दुबेंना शिवसेना स्टाईल ठोकलं

पोलिस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटीस देतील. त्यातून काही साध्य होणार नाही. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 
हा पूल झाला तो दुरुस्त होवून सुरु होईल. याच पूलाची दुसरी मार्गिकेची अलायमेंट बदलली आहे. त्याठिकाणी काम सुरु आहे .तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल पाटील यांनी उपस्थीत करीत त्याला आयुक्त देखील जबाबदार असली असे भाष्य केले आहे. या पूलाच्या मार्गिकेसह दिवा पूलाचा, मेट्रोची अलायमेंटही चेंज करण्यात आली आहे. बड्या बिल्डरांच्या हितासाठी ही अलायमेटं चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - HSRP नंबर प्लेट करता शुल्क भरण्याकरिता 'या' अधिकृत संकेतस्थळाचा करा वापर

मनसे नेते राजू पाटील यांच्या टिकेपश्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार आहोत. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे. विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे. त्यामुळे पलावा पुलाच्या माध्यमातून मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार  राजेश मोरे आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com