एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?

देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो. मात्र सरकारचा विषय आला तर मी माझी भूमिका मांडतोच.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

देवेंद्र फडणवीस आणि मी सोबत काम केलं आहे. आमच्यात काही तात्विक मतभेद कालही होते आजही आहेत आणि उद्या ते मतभेद मिटण्याची ही शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही आजही एकमेकांशी बोलतो. अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून फडणवीस यांच्यासोबत दिल जमाईचे संकेत दिले आहेत. त्यांच्या यावक्तव्याने सर्वांच्या भूवाय उंचावल्या आहेत. शिवाय खडसे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा युटर्न घेतला आहे का? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीला एवढं घवघवीत यश मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं तर महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. अनेक विषय घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भूमिका मांडली. परंतु महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये साडेसात हजार त्यांनी तीन महिन्यात टाकले. ते साडेसात हजार महिलांच्या खात्यावर जमा झाले. लाडक्या बहीणींकडून मत मिळवण्यासाठी महिलांना अप्रत्यक्षपणे त्यांनी लाचच दिली, असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?

ईव्हीएम बाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. पण काही उदाहरणे आहेत ते ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारे असून शंकाना बळकटी देणारे आहे. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा असे म्हणायला वाव आहे असंही ते म्हणाले. अनेक उदाहरणं माध्यमांसमोर येतात. कुणाल रोहिदास पाटील यांच्याच गावात त्यांना शून्य मतं मिळाली आहे. कोणीतरी त्यांचा आधार असेल किंवा त्यांनी त्यांना मत देत असेल. मात्र, या ठिकाणी उमेदवाराच्या गावातच त्याला मत मिळालं नाही. याबाबतीत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परत मतदान करा, अशी मागणी होती. मतदान परत होवू दिलं असते, काय बिघडले असते, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो. मात्र सरकारचा विषय आला तर मी माझी भूमिका मांडतोच. व्यक्तिगत एकमेकांशी दुश्मनी नाही. राजकारणामध्ये मी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी राष्ट्रवादीमध्ये होतो. परत भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो. राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते ते आजही आहेत. पण पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद दूर होवू शकतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?

आमचे भारत पाकिस्तान सारखे युद्ध चाललाय असे नाही. एकमेकांविषयी आमच्यामध्ये काही वेळ तणाव होता तो असू शकतो. काही वेळ तो ते मीटूही शकतात. राजकारणात काही भूमिका वेळेनुसार बदलाव्याही लागतात, अशी प्रतिक्रिया  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र काम केलं आहे. दरम्यान महायुतीमध्ये जे गेले, त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत ते महायुती सोबत राहिले आहेत. ते तिकडे स्वच्छ झाले आहेत. त्यात अजित पवार यांचे उत्तम उदाहरण आहे हे सांगायला खडसे विसरले नाहीत.