जाहिरात

बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?

गावात काय हवा आहे हे आम्हाला माहित होते. घरा घरात प्रचार केला गेला होता. त्यामुळे कल काय आहे हे आम्हाला आधीपासून माहित होते.

बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?
सोलापूर:

मारकडवाडीचं नाता आत संपूर्ण देशात गेलं आहे. त्याचं कारणही तसचं आहे. या गावाने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएमवर अविश्वास दाखवत बॅलेटवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. तशी तयारीही गावाने केली होती. पण प्रशासनाने हस्तक्षेप करत त्यांचा मानस उधळवून लावला. त्यानंतर हे गाव चर्चेत आले.या गावाने असा निर्णय का घेतला? त्यामागचे प्रमुख कारण काय होते? याचा उलगडाच या गावातल्या गावकऱ्यांना आता केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रणजीत मरकड हे मारकडवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांची आई गावची सरपंच आहे. त्यामुळे रणजीत यांचा गावाकऱ्यांबरोबर नेहमीच संवाद आणि संपर्क असतो. त्यांना विधानसभा निवडणुकीत काही तरी गडबड झाल्याचा संशय आहे. मतदान होई पर्यंत आम्हाला कसलीही काळजी नव्हती. आम्ही निर्धास्त होतो. गावातून कोणाला मताधिक्य मिळणार हे आम्हाला माहित होते असं रणजीत आणि गावकरी सांगतात. पण ज्यावेळी निकाल लागला तेव्हा धक्का बसला. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?

या गावात भाजपला 1003 मतं तर तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 843 मतं मिळाली. उत्तर जानकर या गावात पिछाडीवर होते. हे गाव धनगर समाजाचं प्राबल्य असलेलं गाव आहे. असं असताना जानकर कसे मागे पडले असा संशय गावकऱ्यांना आला. त्यांनी तातडीने गावातल्या सर्व लोकांची बैठक बोलवली. त्यात सुशिक्षित, तरूण महिला यांचा समावेश होता, असं रणजीत सांगतात. निकालानंतर आमची मतं कुठे गेल असं प्रत्येक जण विचारत होता. त्याच वेळी आम्हाल ईव्हीएम बाबत शंका आली असंही त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?

त्यानंतर सर्वांनी मिळून आपण आता गावातल्या गावात बॅलेटवर मतदान प्रक्रीया पार पाडूया असा निर्णय घेतला. त्याला गावाने समर्थन दिले. गावकरी त्या गोष्टीसाठी तयार झाले. बॅलेटवर मतदानाची तयारी ही करण्यात आली. मात्र प्रशासनाने हस्तक्षेप केला असं गावकरी सांगतात. तुम्ही तसं केलं तर तुमच्यावर केसेस होतील असं सांगितलं गेलं. याबाबत आमदार आणि खासदारांबरोबर चर्चा ही केली होती. शेवटी दबाव आल्यानंतर सर्वानुमते ही प्रक्रिया स्थगित केली गेली असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच

गावात काय हवा आहे हे आम्हाला माहित होते. घरा घरात प्रचार केला गेला होता. त्यामुळे कल काय आहे हे आम्हाला आधीपासून माहित होते. असे असतानाही इथे मतदान बदललं गेलं असा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले. ही शंका दुर करण्यासाठी बॅलेटवर मतदान घ्यायचं गावकऱ्यांनी ठरवलं होतं. तत्कालीन भाजप आमदार राम सातपूते यांनी गावाला निधी दिला होता. पण दुसऱ्यांच्या तुलनेत तो कमी होता. त्यांनी निधी दिला हे आम्हाला मान्य आहे. ते आम्ही नाकारत नाही असंही गावकरी म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com