जाहिरात

Uddhav Thackeray: 'कम ऑन कील मी' वरून शिंदे गटाने उडवली ठाकरेंची खिल्ली, व्यंगचित्र आणलं समोर

मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.

Uddhav Thackeray: 'कम ऑन कील मी' वरून शिंदे गटाने उडवली ठाकरेंची खिल्ली, व्यंगचित्र आणलं समोर
मुंबई:

शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'कम ऑन कील मी' या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावरून खिल्ली उडवली जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. शिंदे शिवसेनेने ही त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मार्मिक व्यंगचित्राद्वारे घेतला आहे. काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेत शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा मेळावा वरळी येथे पार पडला. शिवसेनेचे मुख्य नेते  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तर, दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या उबाठा गटानेही कालच्याच दिवशी वर्धापन दिन साजरा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी 'कम ऑन कील मी' हे वक्तव्य केलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ

मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. शिवाय त्यावरच्या मीम्सचा पाऊस पडत आहे असं ही शिंदे गटाचं म्हणणं आहे. मात्र, शिवसेनेने सध्याच्या राजकीय स्थितीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका हाती शरद पवारांची कुबडी दाखवून त्यांचे पाय लटपटत असल्याचे दाखवले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Mumbai News: झिंज्या उपटल्या, डोकं फोडलं, लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तूफान राडा, Video viral

तर दुसरीकडे हिरव्या रंगाच्या काँग्रेसरुपी सिलेंडरने ते श्वास घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेऊन आणि शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसेच, काँग्रेसची सोबत करून शिवसेनेच्या मूळ विचारांना उद्धव ठाकरे विसरल्याचे शिवसेनेने या व्यंगचित्रातून अधोरेखित केले आहे. दरम्यान, शिवसेनेने उद्धव ठाकरेंची अवस्था दाखवणारे हे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केले असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com