Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Eknath Shinde On Uddhav Thackeray
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी

Eknath Shinde Latest Speech : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. मुंबईत महायुतीचा बालेकिल्ला निर्माण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात शिंदेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे."मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण आहेत? त्यांना गाडून  आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल",असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त करत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले,"आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही.काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ,असे वागत आहेत. फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात,आज आरायव्हल आणि उद्या डिपार्चर अशी त्यांची अवस्था आहे.ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही.एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत.त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले", असंही शिंदे म्हणाले. 

नक्की वाचा >> जॉन सीनाने 'त्या' चॅम्पियनला हलक्यात घेतलं! शेवटच्या सामन्यात हरला, WWE व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

"तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले"

लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात. तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले.उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली.मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते. याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला, असंही म्हणत शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

नक्की वाचा >> 100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..

"मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा"

"मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले. मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा दिला.मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला.त्यातून 13 हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.नॅशनल पार्क मधील 25 हजार कर्मचाऱ्यांना 5 किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली.मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले.सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून 10 टक्क्यांनी या किंमती कमी केल्या.

50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये पहिल्या टप्यात 17 प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 40 लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत", असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.

Advertisement