Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या विषयावर 'NDTV मराठी' ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमधील अनेक बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सहमती होण्याची चिन्ह आहेत

जाहिरात
Read Time: 2 mins
विधानसभा निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवणारा भाजपा राज्य मंत्रिमंडळातील मोठा भाऊ असेल.
मुंबई:

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या विषयावर 'NDTV मराठी' ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमधील अनेक बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सहमती होण्याची चिन्ह आहेत. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. भाजपाच्या नवनिर्नाचित आमदारांच्या बैठकीनंतर 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. त्याचबरोबर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकानंतरही मुख्यमंत्रीपदाची घोषणा शक्य आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा दोन उपमुख्यमंत्री असतील. मावळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. आता फडणवीसांच्या नेतृत्त्वामध्ये शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री असतील.

( नक्की वाचा : 'गेल्या वेळी त्याग केला, यंदा...', मुख्यमंत्रीपदाबाबत नवनीत राणांचं मोठं वक्तव्य )
 

एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बुधवारी (27 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा श्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचं जाहीर केलं होतं. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर त्यांना तीन महत्त्वाची खाती दिली जाऊ शकतात. त्यांना नगरविकास, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन महत्त्वाची खाती मिळू शकतात. तर, अजित पवार यांच्याकडं अर्थ खाते कायम असेल. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही पवार अर्थमंत्री होते. 

भाजपाकडं निम्मी खाती

विधानसभा निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवणारा भाजपा राज्य मंत्रिमंडळातील मोठा भाऊ असेल. राज्य मंत्रिमंडळाची कमाल मर्यादा 43 आहे. 12 कॅबिनेट मंत्रालयासह निम्मे मंत्री भाजपाचे असतील. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याबद्दल तीन महत्त्वाची खाती दिली जातील. महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं )
 

कधी होणार शपथविधी?

राज्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 2 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.