राहुल कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. आधी पदरात केवळ चार जागा पडल्या. त्यातील केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. पुढे केंद्रात मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही. हे कमी की काय संघाच्या मुखपत्रकात अजित पवारांना टार्गेट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे भवितव्य काय असेल? त्यांच्या समोरचे पर्याय काय आहेत? त्यांचा पराभव का झाला? पुन्हा त्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीत दिली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांचे काय होणार?
अजित पवारांनी भाजप बरोबर जावून चुक केली. त्यांची ताकद टप्प्याटप्प्याने कमी केली जाईल हे आम्ही सुरूवाती पासून सांगत होते. तेच होताना आता दिसत असल्याचे रोहीत पवार यांनी सांगितले. भाजपची भूमीकाच राहीली आहे. वापरा आणि सोडा. मध्य प्रदेशच्या ज्योतिरादीत्य शिंदेंची तीच स्थिती केली. आधी त्यांना वजनदार मंत्रीपद दिले. आता त्यांना साईड लाईनचे मंत्रीपद दिले. पुढच्या वेळी त्यांना उमेदवारीही नाकारतील असेही रोहित पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट
'सत्तेत बसेल आणि आता फसले'
अजितदादा हे भाजप बरोबर सत्तेत जावून बसेल आणि आता फसले असेही रोहित पवार म्हणाले. अजित पवारांचाही भाजप वापर करणार आणि सोडणार. लोकसभा निवडणुकीनंतर संघाच्या मुखपत्रात अजित पवारां विरोधात लिहीले गेले. पराभवाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्यात आले. या पुढच्या काळातही तेच होईल. अजित पवारांवर सर्व दोष देवून खापर त्यांच्याच डोक्यावर फोडले जाईल. त्यामुळे ते सत्तेत जावून बसले असले तरी ते आता पुरते फसले असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
विधानसभेला काय होणार?
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची स्थिती आणखी वाईट होईल. त्यांची 15 ते 20 जागांवर बोळवण केली जाईल. तेवढ्याच जागांवर त्यांना निवडणूक लढावी लागेल. शिवाय निवडणूक चिन्हाची केस कोर्टात आहे. ती आमच्या बाजूने लागेल. त्यामुळे जे चिन्ह आता आहे ते गोठवले जाईल. अशा वेळी त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल. कदाचित अजित पवारही कमळाच्या चिन्हावर लढतील. शिवाय त्यांच्या बरोबरच्या सर्वच आमदारांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबतही रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाला रोहित पवार यांनी सावध पणे उत्तर दिले. कोणत्या पदासाठी काम करत नाही. कोणते पद द्यायचे हे शरद पवार साहेब ठरवतील. पद नाही मिळाले तरी संघटनेत काम करत राहाणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. राज्यात मविआची सत्ता येणार आहे. अशा वेळी मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याला नक्कीच न्याय देईन असे म्हणत थेट मुख्यमंत्रीपदावर बोलण्याचे त्यांनी टाळले.