जाहिरात
This Article is From Sep 10, 2024

Fact Check : राहुल गांधीं 'या' महिला खासदारासोबत लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या लग्नासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Fact Check : राहुल गांधीं 'या' महिला खासदारासोबत लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
नवी दिल्ली:

राहुल गांधी लवकरच एका महिला खासदारासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. सोशल मीडियावर एका वृत्तपत्राच कात्रण जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi Marriage) लग्नबंधनात अडकणार असून येत्या 17 किंवा 22 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. 

विशेष म्हणजे या व्हायरल वृत्तानुसार राहुल गांधी महाराष्ट्राचे जावई (Rahul Gandhi to marry MP Praniti Shinde viral on social media) होणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येसोबत राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अनेकजणं राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर पोस्ट करीत आहे. तर काहींनी त्यांचे जुने व्हिडिओ रिट्विट करण्यास सुरुवात केली आहे. 

याशिवाय एका युट्यूब चॅनलवर Loud India TV चे वरिष्ठ पत्रकार संतोष भारतीय आणि अभय कुमार दुबे यांनीही या अफवेवर चर्चा केली. याची क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता अखिलेश सिंह यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. ही एक अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर अशा प्रकारची चर्चा रंगत असते. काही व्हिडिओ शेअर करीत राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

फॅक्ट चेक...
सोशल मीडियावर काँग्रेस नेता राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची बातमी ज्या वृत्तपत्रात आली आहे, त्याचं नाव तिसरा प्रहर असं आहे. हे वृत्तपत्र जोधपूर, पाली आणि जैसलमेरमधून प्रकाशित होणारं सायंकाळचं वृत्तपत्र आहे.

Latest and Breaking News on NDTV

याबाबत बुम लाइव्हनेही फॅक्ट चेक केलं असून सोशल मीडियावरील चर्चेअंती 3 सप्टेंबरला ही बातमी छापण्यात आल्याचं वृत्तपत्र व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं. 

सोशल मीडियावर काही जणांनी या कथित लग्नाचा जातीशी संबंध जोडला आहे. राहुल गांधी एका दलित मुलीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दलित महिलेशी लग्न करणारे राहुल गांधी हे एकमेव जनेऊ धारी ब्राह्मण असतील, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.