कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनी घेरलं होतं. त्यानंतर एकच गोंधळ झाला. ही घटना नाशिकमध्ये झाली. निमित्त होतं नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेचे. या सभेला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या बैठकीला हजर होते. यावेळी शेतकऱ्यांनी कोकाटेंना घेरण्याचा प्रयत्न केला. शिवाय कर्जमाफीचं काय झालं अशी विचारणा त्यांनी कोकाटें यांच्याकडे केली. पण त्यांनी यावेळी वळा मारून नेली. अशा स्थितीत बैठकीच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा गोंधळ झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांनी घेरण्याचा प्रयत्न यावेळी केला. अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महायुतीने निवडणूक काळात कर्जमाफीची घोषणा केली होती. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. उलट शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसूली सुरू आहे. यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले.
पण शेतकरी भलतेच आक्रमक झाले होते. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे असं यावेळी कोकाटे यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं. या बैठकीनंतर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. गेल्या दोन तीन महिनांपासून बँकेची वसुली सुरू होती. सक्तीची वसुली त्याला स्थगिती दिली होती असं ही ते म्हणाले. वसूलीमुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचं वातावरण होतं असं ही ते म्हणाले.
दरम्यान शेतकऱ्यांकडून मोठ्या व्याजाने वसुली सुरू होती. त्यासाठी जिल्हा बँकेने एक योजना आणली आहे. सहकार विभागाकडून आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आजची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती असं ते म्हणाले. राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना तयार केली आहे. त्या योजना मान्यता मिळावी यासाठी आजची सभा होती. त्यात काही सभासदांनी मागील काही वर्षांची खदखद बोलून दाखवी. त्यामुळे मूळ विषयाची बैठक असूनही विषय फिरवण्याचे काम झाले असं ही ते म्हणाले. मात्र राज्य सरकारकडून आलेली योजना सर्वानुमते मान्य करून त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत असं ही कोकाटे म्हणाले.