"कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ganesh Naik Shocking Statement
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Ganesh Naik Statement Viral : "प्रवासात कोणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ. गाडीत अडचण झाली तरी अडचणही सहन करु. परंतू कोणी बाप होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला बाप दाखवू",असा इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. "भाजप ठाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका,महापालिकांची निवडणूक जिंकेल. कल्याण आणि ठाण्यातही साफ सफाई होणार", असा ठाम विश्वास व्यक्त करत गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे. नाईक यांच्या या खळबळजनक प्रतिक्रियेनंतर शिवेसेना शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येतंय,हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 

बदलापूरच्या सभेत CM फडणवीसांनीही केलं होतं 'ते' विधान

अंबरनाथ -बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरु आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची गुरुवारी बदलापूरमध्ये जाहिर प्रचार सभा झाली. आम्हाला नगर परिषद झेंडा लावण्यासठी नाही आणि खुर्च्या तोडण्यासाठी नको आहे,तर  विकासासाठी पाहिजे, असं मोठं विधान फडणवीसांनी यावेळी केलं होतं.त्यानंतर आज शुक्रवारी अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले वनमंत्री नाईक यांनी भाजप पदाधिकारी आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारंची एक बैठक घेतली. यावेळी नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

नक्की वाचा >>स्मृती मंधाना-पलाशचं पॅचअप होणार? 28 वर्षांची 'ही' अभिनेत्री करणार फुल सपोर्ट, 'आता सर्वात महत्त्वाचं..'

गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?

या बैठकीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार,भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष नंदू परब उपस्थित होते.यावेळी नाईक यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं की, "नवी मुंबई महापालिका,ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातीलनगरपालिका,महापालिकेत भाजपच येणार.अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही भाजपच जिंकेल.ठाणे आणि कल्याणमध्ये चुरशीची लढत आहे.अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजप आली तर कल्याण ठाण्यातही साफ सफाई होणार.प्रवासात कोणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ.गाडीत अचडण झाली तरी अडचण सहन करु. परंतू कोणी बाप होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला बाप दाखवू", असं म्हणत नाईक यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नक्की वाचा >> Viral Video: "ही तर माझी बायको..",सरकारी शाळेत नोकरी लागली, मुलीनं बेरोजगार पोरांसाठी ठेवली लग्नाची ऑफर