
अमजद खान
समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तूती केल्याने संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. आबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. ही मागणी एकीकडे शिवसेना शिंदे गटाने केली आहे. तर आझमी यांच्या भूमीकेबाबत ठाकरे गटाने ही टीका केली आहे. यावर आता मनसेने निशाणा साधला आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी आबू आझमी यांचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे फोटो ट्वीट केले आहे. आम्हीच खातो माती, मग त्यांना कशी राहिल भिती या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे. त्यांनी औरंगजेबाला भीक घातली नाही. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरु असताना राज्याचे अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तूती केली आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
आझमी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात टिकेची झोड उठविण्यात आली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी राजकीय पक्षांकडून आझमीच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. हे सर्व सुरु असताना मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे.
(नक्की वाचा- विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब)
ठाकरें सोबतचे आझमी यांचे फोटे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आझमी त्यांच्यासोबत चर्चा करतानाचे फोटो त्यांनी ट्वीट केला आहे. आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे त्यांच्या सोबत होते. हे पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उघड केले आहे. हे सगळे सत्तेसाठी केले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हीच खातो माती मग त्यांना कशी राहील भिती अशा शब्दात त्यांच्यावर टिका केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world