लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडलं आहे. राज्यातील 11 तर देशातील 96 मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.64 टक्के मतदान झालं असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसरीकडे देशात 96 मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत 67.25 टक्के मतदान झालं आहे.
राज्यभरात अनेक नागरिकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर काही भागात मतदानादरम्यान गोंधळाच्या काही घटना समोर आल्या आहेत. रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर 4 तास वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल टॉर्च लावून कर्मचाऱ्यांनी काम केलं. तब्बल चार तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील आकडेवारी
नंदुरबार - 67.12 टक्के
जळगाव - 53.65 टक्के
रावेर – 61.36 टक्के
जालना – 68.30 टक्के
औरंगाबाद - 60.73 टक्के
मावळ – 52.90 टक्के
पुणे – 51.25 टक्के
शिरूर - 51.46 टक्के
अहमदनगर - 62.76 टक्के
शिर्डी – 61.13 टक्के
बीड - 69.74 टक्के
नक्की वाचा - Highlights: चौथ्या टप्प्यात राज्यात कुठं झालं जास्त मतदान? पाहा प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी
चौथ्या टप्प्यातील देशातील आकडेवारी
आंध्रप्रदेश (25 मतदारसंघ) - 76.50 %
बिहार (5) - 57.06 %
जम्मू आणि काश्मी (1) -37.98 %
झारखंड (4) - 65.2 %
मध्यप्रदेश (8) - 70.98 %
महाराष्ट्र (11) - 59.64 %
ओडिसा (4) - 73.97 %
तेलंगणा (17) - 64.74 %
उत्तर प्रदेश (13) - 58.05 %
पश्चिम बंगाल (8) - 78.37 %