जाहिरात
11 months ago
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज (13 मे) पार पडला. राज्यातील 11 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघातील मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. या टप्प्यात एकूण 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये आंध्र प्रदेशातील सर्व 25, तेलंगणातील सर्व 17, उत्तर प्रदेशातील 13 आणि महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश होता. 

राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.49 टक्के मतदान झालंय. सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये तर शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आहे. 

राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेलं मतदान

महाराष्ट्र - 52.49 %

छत्रपती संभाजीनगर - 54.02%

बीड - 58.21%

मावळ - 46.03 %

पुणे - 44.90%

रावेर - 55. 36%

शिर्डी - 55.27%

जळगाव - 51.98%

जालना - 58.85%

नंदूरबार - 60.60%

शिरूर - 43.89%

अहमदनगर - 53.27%

पुणे लोकसभा मतदारसंघात संथ गतीनं मतदान सुरु आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यात 33.07 टक्के मतदान झालं आहे. 

पुण्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी 

कसबा पेठ - 35.23%

कोथरूड - 37.02%

पर्वती - 38.01%

पुणे कॅन्टोन्मेंट - 31.01%

शिवाजीनगर -  26.61%

वडगाव शेरी -  29.27

महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालंय. सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये तर पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आहे. 

राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं मतदान

महाराष्ट्र - 42.35 %

छत्रपती संभाजीनगर - 43.76%

बीड - 46.49%

मावळ - 36.54 %

पुणे - 35.61%

रावेर - 45. 26%

शिर्डी - 44.87%

जळगाव - 42.15%

जालना - 47.51%

नंदूरबार - 49.91%

शिरूर - 36.43%

अहमदनगर - 41.35%

बीड लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेलं मतदान

एकूण मतदान - 33.65%

गेवराई - 31.67%

माजलगाव - 34.50%

बीड - 28.70%

आष्टी - 36.85%

केज - 36.79%

परळी - 33.26%

पुण्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 26.48% मतदान झालंय.  कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आहे. 

पुण्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी 

कसबा पेठ - 31.10%

कोथरूड - 29.10% 

पर्वती - 27.14%

पुणे कॅन्टोन्मेंट - 23.21%

शिवाजीनगर - 23.26%

वडगाव शेरी - 24.85%

देशात दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32% मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 51.87% मतदान झालंय. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 23.57% मतदारांनी त्यांचा हक्क बजावलाय. महाराष्ट्रात या कालावधीमध्ये 30.85% मतदान झालंय. 

देशातील एकूण मतदान - 40.32%

आंध्रप्रदेश - 40.26 % 

बिहार - 34.44 %

जम्मू आणि काश्मीर - 23.57 %

झारखंड - 43.80 %

मध्यप्रदेश - 48.52 %

महाराष्ट्र - 30.85 %

ओडिसा - 39.30 %

तेलंगणा - 40.38 %

उत्तर प्रदेश - 39.68 %

पश्चिम बंगाल - 51.87% 

राज्यात 1 वाजेपर्यंत झालेलं मतदान

महाराष्ट्र - 30.85 %

छत्रपती संभाजीनगर - 32.37%

बीड - 33.65%

मावळ - 27.4 %

पुणे - 26.48%

रावेर - 32. 02%

शिर्डी - 30.49%

जळगाव - 31.70%

जालना - 34.42%

नंदूरबार - 37.33%

शिरूर - 26.62%

अहमदनगर - 29.45

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जालन्यातील डबल जिम परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने मतदान मशीनचा क्रम बदलून, मतदान मशीन उलट्या क्रमाने ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते तसंच आमदार कैलास गोरंटल यांच्या वतीने करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये ज्येष्ठ मतदारांवर फुलांचा वर्षाव

झारखंडमध्ये ज्येष्ठ मतदारांवर फुलांचा वर्षाव

लेखक एस.एस. राजामौली विमानतळावरुन थेट मतदान केंद्रावर

लेखक एस.एस. राजामौली दुबईहून भारतात येताच विमानतळाहून थेट हैद्राबाद मतदान केंद्रावर पोहोचले आणि आपला हक्क बजावला.

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता प्रवीण तरडे, रमेश परदेशी मतदान केंद्रावर

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता प्रवीण तरडे, रमेश परदेशी यांसोबत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढताना दिसत आहे. 

रावेर येथील मतदान केंद्रावर 4 तास वीज पुरवठा खंडीत

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर 4 तास वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल टॉर्च लावून कर्मचाऱ्यांनी काम केलं. तब्बल चार तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. 

पुण्यात एकूण 16.16 टक्के मतदान

पुण्यात एकूण 16.16 टक्के मतदान 

कोथरूड - 18.20

पर्वती - 17.84

कसबा - 18.10

पुणे केन्टॉन्मेंट - 13 89

शिवाजीनगर - 13.94

वडगाव शेरी -14.77

महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समोर...

महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समोर...

महाराष्ट्र -17.51 %

जळगाव - 16.89 %

जालना - 21.35 %

नंदूरबार - 22.12 %

शिरूर - 14.51 %

अहमदनगर - 14.74 %

छत्रपती संभाजीनगर - 19.53 %

बीड - 16.62 %

मावळ - 14.87 %

पुणे - 16.16 %

रावेर - 19.03 %

शिर्डी - 18.91 %

पुण्यात सकाळी 9 वाजेपर्यंत कोथरूडमध्ये सर्वाधिक मतदान

पुणे लोकसभा मतदानाची सकाळी नऊ वाजेपर्यंतची एकूण टक्केवारी 6.61%

कसबा पेठ विधानसभा - 6.93 % 

कोथरूड - 7.59 %

पर्वती - 6.99 %

पुणे कॅन्टोन्मेंट - 5.69 %

शिवाजीनगर - 6.46 %

वडगाव शेरी - 5.90 %

मतदानासाठी बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये 21 लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दहा हजार पाचशे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसंच 3500  पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  सकाळपासूनच बीड शहरातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत आहेत. 

सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

आंध्रप्रदेश - 9.05 % 

बिहार - 10.18 %

जम्मू आणि काश्मीर - 5.07 %

झारखंड - 11.78 %

मध्यप्रदेश - 14.97 %

महाराष्ट्र - 6.45 %

ओडिसा - 9.23 %

तेलंगणा - 9.51 %

उत्तर प्रदेश - 11.67 %

पश्चिम बंगाल - 15.24 %

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक14 येथे पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करत असल्याचं ट्विट शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केले.

सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी समोर, नंदूरबारात सर्वाधिक मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी समोर, नंदूरबारात सर्वाधिक मतदान

महाराष्ट्र - 6.45 %

जळगाव - 6.14 %

जालना - 6.88 %

नंदूरबार - 8.43 %

शिरूर - 4.97 %

अहमदनगर - 5.13 %

छत्रपती संभाजीनगर - 7.52 %

बीड - 6.72 %

मावळ - 5.38 %

पुणे - 6.61 %

रावेर - 7.14 %

शिर्डी - 6.38 %

छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी EVM यंत्रांमध्ये बिघाड

छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी EVM यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली होती. यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला

आज अत्यंत महत्त्वाचा दिवस, मतदानापूर्वी आईने औक्षण केलं. उष्णता खूप आहे, मात्र तरीही योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा. ऊन जास्त असतानाही बीडमध्ये मतदानाचा आकडा चांगला असेल, असा विश्वास आहे.  - बीड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या नवगन राजुरी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. सत्तेच्या आमिषापोटी लोक सोडून गेले. मात्र आम्ही पक्ष सोडला नाही आणि जनता आमच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. 

हैद्राबाद येथील ज्युबली हिल्स येथे सुपरस्टार चिरंजीवी कुटुंबासह मतदानासाठी दाखल झाला आहे.

हैद्राबाद येथील ज्युबली हिल्स येथे सुपरस्टार चिरंजीवी कुटुंबासह मतदानासाठी दाखल झाला आहे.  

हैद्राबादमधून AIMIM चे उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

राज्यातील अनेक भागात पावसामुळे उन्हापासून दिलासा, मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा

आता नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात मतदान सुरू आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आज मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भाजप नेते चंद्रकांत पाटील मतदानासाठी रांगेत उभे

सिनेस्टार अल्लू अर्जुन मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

सिनेस्टार अल्लू अर्जुन मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

अभिनेता ज्युनिअर एनटीआर हैद्राबाद येथे मतदानासाठी दाखल

अभिनेता ज्युनिअर एनटीआर हैद्राबाद येथे मतदानासाठी दाखल

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला देशभरात सुरुवात