जाहिरात

Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा पुन्हा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर

Petrol-Diesel Price Hike Today: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा पुन्हा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर

आखाती देशांमधील इराण युद्धाच्या (Iran War) वाढत्या तणावाचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामांमुळे देशात गेल्या 10 दिवसांत तब्बल चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या ताज्या दरवाढीमुळे नवी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीने प्रतिलिटर 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे.

सोमवारी 25 मे रोजी देशभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.71 रुपयांची मोठी वाढ जाहीर करण्यात आली.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

प्रमुख महानगरांमधील आजचे दर 

पेट्रोलचे नवीन दर

  • मुंबई: 111.21 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
  • दिल्ली: 102.12 रुपये (2.61 रुपयांची वाढ)
  • कोलकाता: 113.51 रुपये (2.87 रुपयांची वाढ)
  • चेन्नई: 107.77 रुपये (2.46 रुपयांची वाढ)

(नक्की वाचा-  Power Crisis: राज्यावर वीजटंचाईचं संकट! महानिर्मितीचे 6 वीज संच ठप्प; पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे)

डिझेलचे नवीन दर 

  • मुंबई: 97.83 रुपये (2.81 रुपयांची वाढ)
  • दिल्ली: 95.20 रुपये (2.71 रुपयांची वाढ)
  • कोलकाता: 99.82 रुपये (2.80 रुपयांची वाढ)
  • चेन्नई: 99.55 रुपये (2.57 रुपयांची वाढ)

या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ

  1. 23 मे रोजी - पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली.
  2. 19 मे रोजी - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ झाली होती.
  3. 15 मे रोजी - देखील दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाली होती.

इंधन दरवाढीचा परिणाम

बस आणि ऑटोचे भाडे: सार्वजनिक वाहतूक आणि शालेय बसच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

मालवाहतूक शुल्कात वाढ: ट्रक आणि टेम्पोच्या दरात वाढ होईल. त्यामुळे इतर राज्यांतून आयात होणाऱ्या भाजीपाला, फळे आणि शिधासामग्री महाग होईल.

शेतीचा खर्च: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पंपिंग सेट चालवण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल, ज्यामुळे धान्याचा भाव वाढेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com