Petrol-Diesel Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत होणारी वाढ आणि देशांतर्गत स्थिर असलेले इंधन दर यामुळे सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. खर्च वाढूनही एप्रिल 2022 पासून किरकोळ किमतीत बदल न केल्यामुळे कंपन्यांना प्रत्येक लिटरमागे मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
'मॅक्वेरी ग्रुप'ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमती लक्षात घेता तेल कंपन्यांची स्थिती चिंताजनक आहे. पेट्रोलमध्ये प्रति लिटर 18 रुपये तर डिझेलमध्ये प्रति लिटर 35 रुपये तोटा कंपन्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांना दररोज 2400 कोटी रुपयांचा फटका बसत होता, जो सरकारने उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केल्यानंतर आता 1600 कोटी रुपयांवर आला आहे.
VIDEO
(नक्की वाचा- VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झोंबी'? मुंबई लगतच्या परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)
जानेवारी-फेब्रुवारीतील नफा 'मार्च'मध्ये बुडाला
सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांना जो काही नफा झाला होता, तो मार्चमधील वाढत्या किमतींमुळे पूर्णपणे संपला आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत तिन्ही प्रमुख सरकारी कंपन्यांना मोठा तोटा होण्याची शक्यता वर्तवली आहे.
(नक्की वाचा- Political News: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता; '2003' ची पुनरावृत्ती?)
निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचे संकेत
ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, सध्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांसारख्या प्रमुख राज्यांमध्ये निवडणुकांचे वातावरण आहे. या निवडणुकांचे मतदान संपताच तेल कंपन्या किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world