मुंबई:
बहुप्रतिक्षित पालकमंत्रिपदाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. रायगड, बीड, जळगाव या जिल्ह्याच्याचे पालकमंत्रिपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याची प्रतिक्षा आता संपली आहे. अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले आहे. तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांचीच वर्णी लागली आहे. जळगावचे पालकमंत्रिपद मात्र गुलाबराव पाटील यांनी मिळाले आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याची पालकमंत्रिपद मिळाले आहे त्याची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पालकमंत्र्यांची यादी
- गडचिरोली देवेंद्र फडणवीस
- ठाणे एकनाथ शिंदे
- मुंबई शहर एकनाथ शिंदे
- पुणे अजित पवार
- बीड अजित पवार
- नागपूर चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम हसन मुश्रीफ
- सांगली चंद्रकांत पाटील
- नाशिक गिरीश महाजन
- पालघर गणेश नाईक
- जळगाव गुलाबराव पाटील
- यवतमाळ संजय राठोड
- मुंबई उपनगर आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा
- रत्नागिरी उदय सामंत
- धुळे जयकुमार रावल
- जालना पंकजा मुंडे
- नांदेड अतूल सावे
- चंद्रपूर अशोक उईके
- सातारा शंभूराज देसाई
- रायगड आदिती तटकरे
- लातूर शिवेंद्रसिंहराजे भोसले
- नंदूरबार माणिकराव कोकाटे
- सोलापूर जयकुमार गोरे
- हिंगोली नरहरी झिरवाळ
- भंडारा संजय सावकारे
- छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट
- धाराशिव प्रताप सरनाईक
- बुलडाणा मकरंद जाधव (पाटील)
- सिंधुदुर्ग नितेश राणे
- अकोला आकाश फुंडकर
- गोंदिया बाबासाहेब पाटील
- कोल्हापूर प्रकाश आबिटकर
- कोल्हापूर माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
- गडचिरोली आशिष जयस्वाल (सह -पालकमंत्री)
- वर्धा पंकज भोयर
- परभणी मेघना बोर्डीकर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world