मोदींच्या स्वप्नाचा शिल्पकार, हरियाणात केला चमत्कार! मिस्टर डिपेंडेबल होणार भाजपाचा अध्यक्ष?

Haryana Election Results 2024 : हरियाणामध्ये 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीनं (BJP) पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

हरियाणामध्ये 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीनं (BJP) पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. राजकीय विश्लेषक आणि एग्झिट पोल्सना खोटं ठरवत भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. या विजयाचं मोठं श्रेय भाजपाचे वरिष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांचं आहे. हरियणातील विजय हा देशातील अनेकांसाठी चमत्कार मानला जात आहे. पण प्रधान यांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती असणाऱ्यांसाठी हे आश्चर्य नाही. त्यांनी यापूर्वीही अनेक खडतर आव्हानं यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ओडिशात झाली सुरुवात

ओडिशातील उत्कल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. 55 वर्षांचे धर्मेंद्र प्रधान गेल्या एक दशकांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे प्रमुख सहकारी आहेत. प्रधान ओडिशातील भाजपाचा प्रमुख चेहरा आहेत. ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचा प्रचार दोन मुख्य मुद्यांवर केंद्रीत केला होता. त्यांची ही रणनिती यशस्वी ठरली.

आयएएस अधिकारी ते नेते बनलेले व्हीके पांडियन यांना त्यांनी बाहेरचा व्यक्ती म्हणून टार्गेट केलं. त्याचबरोबर पूरीमधील जगन्नाथ मंदिराच्या पवित्र रत्न भांडारा हरवलेल्या किल्लीचा मुद्दा देखील भाजपाच्या ओडिशातील प्रचाराचा केंद्रबिंदू होता. प्रधान यांनी निश्चित केलेल्या या दोन मुद्यांचा भाजपाला फायदा झाला. राज्यातील नवीन पटनाईक यांची 24 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. 

( नक्की वाचा :  हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र )

हरियाणाचे शिल्पकार

धर्मेंद्र प्रधान यांनी 2019 प्रमाणेच 2024 मध्ये देखील हरियाणामधील भाजपाच्या निवडणूक रणनितीचे व्यवस्थापन, दैनिक कार्य आणि जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

हरियाणा छोटं राज्य असलं तरी ही निवडणूक महत्त्वाची होती. लोकसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपापुढं प्रस्थापितांच्या विरोधी लाटेचं आव्हान होतं. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी प्रधान यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला.  

हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज निवडणुकीच्या दरम्यान स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. त्यावेळी प्रधान यांनी त्यांना तातडीनं फटकारलं. 

( नक्की वाचा :  'भारत तोडण्याच्या कटात काँग्रेस सहभागी', हरियाणा जिंकल्यानंतर PM मोदींचा हल्लाबोल )

कुशल संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांना पंतप्रधान मोदींच्या 'उज्ज्वला मॅन' म्हणून ओळखले जाते. 'उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना गॅस देण्याचं पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांनी पूर्ण केलं. NET-NEET पेपर-लीक पेचप्रसंग सोडवण्यासाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

Advertisement

लवकरच मिळणार मोठी जबाबदारी?

धर्मेंद्र प्रधान यांनी 1983 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून सामाजिक कामांना सुरुवात केली. त्यांनी 2000 साली पल्लालहारमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली. 2004 मध्ये देवगढ लोकसभा मतदारसंघातील ते भाजाचे उमेदवार होते. 2009 मध्ये ते पराभूत झाले. पण, 2010 साली त्यांची भाजपानं राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यातील संघटनकौशल्याची क्षमता ओळखूनच पक्षानं प्रधान यांना ही जबाबदारी सोपवली. 

2012 साली त्यांची बिहारमधून राज्यसभेवर निवड झाली. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओडिशातील संबळपूर मतदारसंघातून एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची खूर्ची लवकरच रिकामी होणार आहे. पंतप्रधान मोदी जेपी नड्डा यांच्या जागेवर धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती करणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. हरियाणातील विजयानंतर त्यांचं नाव या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे.   
 

Advertisement