जाहिरात

'भारत तोडण्याच्या कटात काँग्रेस सहभागी', हरियाणा जिंकल्यानंतर PM मोदींचा हल्लाबोल

Haryana Election Results 2024 : हरियाणामध्ये भाजपाला मिळालेला विजय आहे गीतेच्या जमिनीवर सत्याचा विजय आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

'भारत तोडण्याच्या कटात काँग्रेस सहभागी', हरियाणा जिंकल्यानंतर PM मोदींचा हल्लाबोल
नवी दिल्ली:


Haryana Election Results 2024 : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात गेले होते. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. हरियाणामध्ये भाजपाला मिळालेला विजय आहे गीतेच्या जमिनीवर सत्याचा विजय आहे, असा दावा त्यांनी केला. 

पंतप्रधानांनी सांगितलं की, आज मां कात्यायिनीच्या पूजेचा दिवस आहे. देवीनं हातामध्ये कमळ धारण केलं आहे. या दिवशी हरियाणामध्ये कमळ उगवलं आहे. गीतेच्या जमिनीवर हा सत्य, विकास आणि सुशासनाचा विजय आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ते पुढं म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये दशकभराच्या प्रतीक्षेनंतर शांततेत निवडणुका झाल्या. तिथं काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळालं. मी त्यांना विजयाच्या शुभेच्छा देतो. 

पंतप्रधानांनी सांगितलं की,  जम्मू काश्मीरनं काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला कौल दिला आहे. पण, व्होट शेअरनुसार तिथं भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकांनी भाजपाचीच सर्वात मोठा पक्ष म्हणून निवड केली आहे. मी हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या जनतेचं खूप खूप अभिनंदन करतो. 

( नक्की वाचा : हरियाणातील भाजपाच्या विजयानंतर राहुल गांधी आणि जिलबीची का होतीय चर्चा? )
 

हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. जागोजागी कमळ उगवलं आहे. प्रत्येत वर्ग, प्रत्येक जातीनं मत दिलं आहे. हरियाणामध्ये खोट्या प्रचारावर विकास भारी पडला आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'गुजरात आणि मध्य प्रदेशनं दोन दशकांपासून भाजपाला संधी दिली आहे. उत्तर प्रदेशात कायदा सूव्यवस्थेचा विचार करुन दुसऱ्यांदा संधी मिळाली. काँग्रेसला दुसऱ्यांदा संधी कधी मिळाली ? तेरा वर्षांपूर्वी आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर कोणत्याही राज्यानं काँग्रेसला पुन्हा संधी दिलेली नाही. 

काँग्रेसला दलित आणि मागासवर्गीयांचं आरक्षण समाप्त करायचं आहे. काँग्रेससारखा पक्ष आणि त्याचे चट्टे-बट्टे भारत तोडण्याच्या कटात सहभागी आहेत. हरियाणानं त्याचं उत्तर दिलं आहे. काँग्रेस परजीवी पक्ष बनला आहे. 

पंतप्रधानांनी सांगितलं की, आजही काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थांच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. जम्मू काश्मीरमधील निवडणुका ऐतिहासिक ठरल्या. राज्यघटना लागू झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. स्वातंत्र्यानंतर लोकांना मत टाकण्यासाठी परवानगीची गरज नाही. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर जळलं नाही तर फुललं आहे. 

( नक्की वाचा : Haryana Election Results 2024: किती चालले जवान, किसान आणि पहेलवान फॅक्टर? निकाल काय सांगतात? )
 

काँग्रेस भारताला कमकुवत करुन देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या वर्गाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सतत आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना कसा चिथवण्याचा प्रयत्न केला हे देशानं पाहिलं आहे. हरियाणातील शेतकऱ्यांनी चोख उत्तर दिलं आहे. ते भाजपाबरोबर आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com