केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी काँग्रेसच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसच्या आरोपांवर त्यांनी सांगितलं की, काँग्रेसनं ज्या पद्धतीनं तथ्याचा विपर्यास करुन लोकांसमोर सादर केलं आहे, ते अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस हा संविधानविरोधी पक्ष आहे, त्यांनी अनेकदा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे.
संसदेतील चर्चेच्या दरम्यान भाजपाच्या वक्त्यांनी संविधानाची रचना, संविधानाची मुल्य याची अनेक उदाहरणं सर्वांसमोर ठेवली. त्यामधून काँग्रेस हा आंबेडकर विरोधीपक्ष आहे, हे निश्चित झालं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभेत झालेल्या संविधानावरील चर्चेला उत्तर दिलं होतं. त्या भाषणामध्ये शाह यांनी आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंबेडकरांना डावललण्याचा प्रयत्न
केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, 'काँग्रेसनं पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या पद्धतीनुसार वक्तव्याची छेडछाड करुन त्यावर खोटे कपडे घालून समाजात गैरसमज पसरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर यांचा तीव्र विरोध केला होता, हे संसदेमधील चर्चेत सिद्ध झालं आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतरही काँग्रेसनं त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : 'आंबेडकरांविरुद्ध काँग्रेसनं सतत लबाडीने...' अमित शाहांना घेरणाऱ्या विरोधकांवर PM मोदींचा प्रहार )
काँग्रेसच्या आरोपांना उत्तर
काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना शाह यांनी सांगितलं की, मी अशा पक्षातून आलो आहे की जो कधीही बाबासाहेबांचा अपमान करु शकत नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना समाजात गैरसमज पसरवायचा आहे.
बाबासाहेबांना भारतरत्न मिळू नये यासाठी काँग्रेसचा प्रयत्न
काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत त्यांनी सांगितलं की, 'काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा स्वत:लाच भारतरत्न दिले आहेत. 1955 साली नेहरुजींनी स्वत:लाच भारतरत्न दिले. 1971 मध्ये इंदिराजींनी स्वत:ला भारतरत्न दिले. पण, बाबासाहेबांना भारतरत्न 1990 साली मिळालं. त्यावेळी काँग्रेसची सत्ता नव्हती. तर, भाजपाचा पाठिंबा असलेलं सरकार होतं. 1990 पर्यंत बाबासाहेबांना भारतरत्न मिळू नये यासाठी काँग्रेसचा प्रयत्न होता. इतकंच नाही तर बाबासाहेबांची 100 वी जयंती देखील काँग्रेसनं साजरी केली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world