Navneet Rana: नवनीत राणा पुन्हा चर्चेत! या वेळी कारण आहे त्यांची संपत्ती, आकडे पाहून डोळे फिरतील

माजी खासदार असलेल्या नवनीत राणा या कोट्यवधींच्या मालमत्तेच्या मालकीण आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) या काहीना काही कारणाने चर्चेत असतात. त्यांना नुकतीच सामूहिक अत्याचार करण्याची धमकी आली होती. ही धमकी थेट हैदराबादहून आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या आधी ही त्यांना धमकी आली आहे. या धमकीनंतर नवनीत राणा यांच्या संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्रीनंतर राजकारणी झालेल्या नवनीत राणा यांची संपत्ती किती असेलि असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर हे तुमचे डोळे फिरवून टाकेल.   

नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत. त्यांनी आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्या महाराष्ट्रातल्या अमरावतीत  आपले स्थान निर्माण केले आहे. तेलगू चित्रपटसृष्टीत यशस्वी अभिनेत्री म्हणून काम केलं.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमरावतीमधून अपक्ष खासदार म्हणून विजय मिळवला. त्यांचे पती रवी राणा हे महाराष्ट्रातील एक परिचित राजकारणी आहेत. मात्र त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली. पण त्यांना पराभवाचा फटका बसला. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

माजी खासदार असलेल्या नवनीत राणा या कोट्यवधींच्या मालमत्तेच्या मालकीण आहेत. उपलब्ध माहितीनुसार, नवनीत राणा यांच्या नावावर सुमारे 9 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. राणा दाम्पत्याकडे अमरावतीमध्ये 1 कोटी 56 लाख रुपयांची शेतजमीन आहे. तसेच, त्यांच्या पतींच्या नावावर 46 लाख रुपयांची व्यावसायिक इमारत (Commercial Building) देखील आहे. मुंबईतील तीन आलिशान घरे नवनीत राणा यांच्या नावावर आहेत.  मुंबईत तीन आलिशान घरे आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

नक्की वाचा - 'या' स्कूटरचा मार्केटमध्ये बोलबाला! किंमत फक्त 74 हजार, आतापर्यंत 3 कोटी पेक्षा जास्त जणांनी केली खरेदी

पाटलीपुत्र अंधेरी (पश्चिम) येथे त्यांचा अलिशान फ्लॅट आहे. तो कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगितलं जातं. गोरेगाव इथे ही त्यांचा फ्लॅट आहे. त्याची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. तर खार पश्चिमला त्यांचा अलिशान फ्लॅट आहे. या पॉश भागातील तिसऱ्या घराची किंमत 5 कोटी रुपयांहून अधिक आहे. सोने, चांदी आणि लक्झरी गाड्या राणा दाम्पत्याकडे सुमारे 60 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे लक्झरी गाड्यांचा मोठा संग्रह आहे. यात दोन Toyota Fortuner, एक Scorpio आणि एक MG Gloster या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत 1 कोटी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. नवनीत राणा यांचे अभिनय क्षेत्रातील यश आणि राजकीय कारकीर्द, तसेच त्यांची मोठी संपत्ती, त्यांना चर्चेत ठेवणारी प्रमुख कारणे आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article