जाहिरात

'या' स्कूटरचा मार्केटमध्ये बोलबाला! किंमत फक्त 74 हजार, आतापर्यंत 3 कोटी पेक्षा जास्त जणांनी केली खरेदी

साधारण 107 किलो वजन असणारी ही स्कूटर 45 ते 50 किमी प्रति लिटर मायलेज देते.

'या' स्कूटरचा मार्केटमध्ये बोलबाला! किंमत फक्त 74 हजार, आतापर्यंत 3 कोटी पेक्षा जास्त जणांनी केली खरेदी
मुंबई:

मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी दैनंदिन वापरातील दुचाकीमध्ये ही एक गरज बनली आहे. त्यात ही  होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) चे नाव अग्रस्थानी घेतले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्या 24 वर्षांत या स्कूटरने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले आहे.  होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने या स्कूटरच्या 3.5 कोटींहून अधिक युनिट्सची विक्री करण्याचा विक्रम नोंदवला आहे. हा एक अनोख विक्रम मानायला हवा. त्यात आता होंडाची नव्याने बाजारात दाखल झालेल्या स्कूटरने तर सर्वांनाच भूरळ घातली आहे. 

विक्रीचा चढता आलेख या स्कूटरचा पाहायला मिळत आहे.  अ‍ॅक्टिव्हाने 2015 पर्यंत 1 कोटी विक्रीचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत, 2018 मध्ये हा आकडा 3 कोटींवर पोहोचला. आता 2025 मध्ये 3.5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक मिळवून या स्कूटरने बाजारात आपला निर्विवाद दबदबा सिद्ध केला आहे. सध्याच्या स्थितीत पाहीले तर बहुतांश लोकांकडे होंडाची अॅक्टीव्हा ही असतेच असते. 

नक्की वाचा - Shocking news: पत्नीचे अवैध संबंध, पतीला खबर लागली, त्याने पुढे जे काही केलं ते पाहून तुम्ही हादरून जाल

ग्राहकांच्या पसंतीचे कारण केवळ सुरुवातीपासून चांगले डिझाईन नाही, तर वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची अ‍ॅक्टिव्हाची क्षमता हेच तिच्या यशाचे खरे गमक असल्याचं बोललं जात आहे. तंत्रज्ञान आणि डिझाईनमध्ये सातत्याने अपडेट करत राहिल्याने ही स्कूटर ग्राहकांना कधीही जुनी वाटली नाही. अलीकडेच 'Activa e' सह इलेक्ट्रिक स्कुटी (Electric Scooty) देखील याच मालिकेत लाँच करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

मॉडेल आणि किंमत काय आहे ही ही जाणून घेवूयात. सध्या अ‍ॅक्टिव्हा दोन पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये (110 सीसी आणि 125 सीसी) उपलब्ध आहे. Activa 110 ची किंमत 74,369 रुपये (एक्स-शोरूम) तर Activa 125 सीसीची किंमत 88,339 रुपये आहे. साधारण 107 किलो वजन असणारी ही स्कूटर  45 ते 50 किमी प्रति लिटर मायलेज देते. या कामगिरीमुळेच अ‍ॅक्टिव्हा आजही भारतीयांच्या पसंतीस उतरत आहे.  
  

   
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com