Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

सिंधुदुर्गात 30 वर्षापूर्वी झालेल्या राजकीय हत्येची चर्चा पुन्हा एकदा होवू लागली आहे. ती हत्या होती काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची. त्यांचेच पुतणे वैभव नाईक आता मालवणचे आमदार आहेत.

Advertisement
Read Time: 4 mins
सिंधुदुर्ग:

नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, सिंधुदुर्गात 30 वर्षापूर्वी झालेल्या राजकीय हत्येची चर्चा पुन्हा एकदा होवू लागली आहे. ती हत्या होती काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची. त्यांचेच पुतणे वैभव नाईक आता मालवणचे आमदार आहेत. राणेंचा टोकाचा विरोध मोडत त्यांनी राणेंनाच या मतदार संघात शह दिली. येवढचं नाही तर एकदा त्यांचा मोठ्या फरकाने पराभव ही केला.  घरात घुसून रात्रीत मारून टाकेन असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्यानंतर वैभव नाईक यांनी तीस वर्षापूर्वी झालेल्या आपल्या काकांच्या हत्येची आठवण पून्हा एकदा झाली. त्यांनी त्यावेळचा सर्व घटनाक्रमत एनडीटीव्हीला सांगितला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

श्रीधर नाईक हे 80-90 च्या दशकात सिंधुदुर्गात काँग्रेसचे काम करत होते. त्यांनी युवक काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. कोकणातला काँग्रेसचा तरूण आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. त्यावेळी कोकणात समाजवादी आणि काँग्रेसचा जोर होता. त्याच काळात म्हणजे 1990 मध्य नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सिंधुदुर्गची जबाबदारी दिली. त्यांनीही पहिल्याच प्रयत्नात आमदारकी पटकावली. यावेळी श्रीधर नाईक यांची लोकप्रियता वाढत होती. ते मतदार संघात सक्रीय होते. अशा वेळी 22 जून 1990 साली भर दुपारी श्रीधर नाईक यांचा खून करण्यात आला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत

कोकणात अशी राजकीय हत्या कधीच झाली नव्हती. कोकणाच्या राजकीय इतिहासातील ही पहिली हत्या. ही हत्या नारायण राणे यांनीच केली असल्याचा आरोप त्यावेळी नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी 13 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण राणे हे यात तेरावे आरोपी होते असे वैभव नाईक सांगतात. या खूनाचा खटला सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात चालला. हा खटला जेव्हा चालू होता त्यावेळी नारायण राणेंना वेळोवेळी हजर राहावे लागत होते. ते आमदार असताना ही आणि नंतर मंत्री झाल्यानंतर ही नारायण राणे हाजीर हो असे कोर्टात ओरडले जातये. वैभव नाईक आपल्या आठवणी सांगतात. ज्या ज्या वेळी राणेंचे नाव घेतले जायचे त्या त्या वेळी त्यांना हजर राहाले लागत होते, असे वैभव नाईक यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला हा प्रकार; फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरमध्ये काय घडलं?

1997 साली या खटल्याचा निकाल लागला. या खटल्यात 4 जणांना दोषी ठरवण्यात आले. तर 9 जणांची पुराव्या अभावी सुटका करण्यात आली. त्यात नारायण राणेही होते. नाईक कुटुंबानीनंतर जिल्हा न्यायालय, मुंबईच उच्च न्यायालयातही धाव घेतल्याचे नाईक सांगतात. पण न्याय मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयातही फेरविचार याचिका दाखल केली पण पुढे काहीच झाले नाही. सर्व शक्ती वाया जात होती.असे नाईक म्हणाले. शिवाय आम्ही सर्व लहान होतो. आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या दुसऱ्या काकांवर होती. त्यामुळे हा खटला मागे पडला. पण राजकीय व्यासपिठावर राणेंना आपण जशाच तसे उत्तर दिले असे नाईक सांगतात. शिवाय मालवण मधून पराभवही केला असेही ते सांगतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आधी सहकार्याची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली, चक्रावून सोडणाऱ्या 'त्या' हत्याकांडाचे गुढ उकललं

या आठवणी ताज्या होण्याचे कारणही वैभव नाईक यांनी सांगितले आहे. श्रीधर नाईक यांच्या हत्येला तीस वर्षे झाली आहे. तीस वर्षानंतरही राणे यांच्यात काहीच बदल झाला नाही. त्यामुळेच ते आता सर्वां समोर घरात घुसून मारून टाकेन अशी वक्तव्य करत आहेत असे वैभव नाईक म्हणाले. ही धमकी राणेंनी आम्हालाच दिली आहे. धमक्यामागून धमक्या ते देत आहेत. राणे यांना केंद्राने आणि राज्याने जे संरक्षण दिले आहे ते याच धमक्या देण्यासाठी दिले आहे का? असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेतील निसटत्या विजयानंतर राणे पुन्हा राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड

देवेंद्र फडणवीसांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यावरही वैभव नाईक यांनी टिका केली आहे. या फडणवीसांना आठ वर्षापूर्वी विधान परिषदेत राणें बाबत केलेले वक्तव्य खरे होते की ते आज बोलत असलेले खरे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे राणे बदलले की फडणवीस बदलले असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने केला आहे. राणेंमध्ये काही बदल झालेला नाही ते तीस वर्षापूर्वी जसे होते तसेच ते आताही आहेत. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. पोलीसही त्यांच्या दबावाखाली आहेत असेही नाईक यावेळी म्हणाले.