लोकसभा निवडणुकीत विरोध पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीत काँग्रेसह तृणमुल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रीय जनता दल, नॅश्नल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी या सारखे पक्ष सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र या आघाडीत धुसफूस पहायला मिळत आहे. त्यामुळे ही आघाडी लवकरच संपुष्टात येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडिया आघाडीत सर्वा काही ठिक चाललं नाही. आघाडी बिघाडी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यात आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोठे विधान केले आहे. अब्दुल्ला यांचा नॅश्नल कॉन्फरन्स इंडिया आघाडीचा भाग आहे. लोकसभे बरोबर जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुकी त्यांनी इंडिया आघाडी म्हणून लढवल्या आहेत. निवडणुकीनंतर अब्दुल्ला यांचे सुर मात्र बदलले आहेत. इंडिया आघाडीकडे सध्या कोणताही अजेंडा नाही. शिवाय लीडरशिप ही नाही. विरोधकांमध्ये कोणती ही एकजूट दिसत नाही. त्यामुळे इंडिया आघाडी बरखास्त करायला हवी, असं वक्तव्य र अब्दुल्ला यांनी केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच वेळी ओमर अब्दुल्ला यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ही आप आणि काँग्रेस वेगळे लढत आहेत. हे दोन्ही पक्ष लोकसभेला इंडिया आघाडीचा भाग होते. अब्दुला यांनी ही मागणी करण्या आधी ममता बॅनर्जी यांनी ही इंडिया आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय आपण इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाला आघाडीच्या काही नेत्यांनी समर्थन ही दिले होते. मात्र पुढे काहीच झाले नाही.
त्यात आता ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी बरखास्त करावी अशीच मागणी केली आहे. त्यात दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही मोठे विधान केले आहे. इंडिया आघाडी ही लोकसभेसाठीच होती. आता विविध राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णय घेत आहेत. ते त्यांचा निर्णय घेतली. इंडिया आघाडी चालवता येत नसेल तर मला संधी द्या मी इंडिया आघाडी चालवून दाखवते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी ही इंडिया आघाडी लोकसभेसाठीच होती असं म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world