जाहिरात

Forbes reports : गौतम अदाणींविरोधात अमेरिका न्याय विभागाचं पाऊल एक धोरणात्मक चूक - फोर्ब्स

या लेखामध्ये पश्चिमेकडील देशांसाठी एक मुख्य भागीदार किंवा सपोर्टर म्हणून भारत किती महत्त्वाचा आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

Forbes reports : गौतम अदाणींविरोधात अमेरिका न्याय विभागाचं पाऊल एक धोरणात्मक चूक - फोर्ब्स

अमेरिकेच्या न्याय विभागाकडून (U.S DoJ) अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्याविरोधातील खटल्याला भौगोलिक राजकीय परिणामांसह एक धोरणात्मक चूक असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या फोर्ब्स  नियतकालिकातील लेखात याबद्दल लिहिण्यात आलं आहे.  फोर्ब्सच्या या लेखकाचं शीर्षक आहे The US Harms The West's Alliances With A Far-Flung Indictment In India' म्हणजे अमेरिकेने भारतावर अभियोग लावून पश्चिमकेडील देशांचं नुकसान केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पश्चिमेकडील देशांसाठी भारत एक महत्त्वपूर्ण भागीदार...
लेखक मेलिक कायलान यांच्या फोर्ब्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, लाचखोरी आणि आर्थिक गैरसमजांच्या आरोपांमुळे भारत-अमेरिकेच्या संबंधाला नुकसान पोहोचू शकतं. या लेखात मेलिक कायलन यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला. यानुसार, लाचखोरी आणि आर्थिक गैरसमजांच्या आरोपांमुळे भारत-अमेरिका संबंध बिघडण्याची भीती आहे. विशेषत: जेव्हा अमेरिकेला चीनशी अप्रत्यक्षपणे लढण्यासाठी मजबूत पाठिंब्याची आवश्यकता आहे. या लेखामध्ये पश्चिमेकडील देशांसाठी एक मुख्य  भागीदार किंवा सपोर्टर म्हणून भारत किती महत्त्वाचा आहे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. 

Bhadla-Fatehpur HVDC Project: अदाणी एनर्जीला मिळाले 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम

नक्की वाचा - Bhadla-Fatehpur HVDC Project: अदाणी एनर्जीला मिळाले 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम

विशेषत: भारत-मध्यपूर्व इकोनॉमिक कॉरिडोअर सारख्या प्रकल्पांमध्ये ज्याचा उद्देश चीनच्या 'बेल्ट अँड रोड' प्रकल्पाला एक पर्याय निर्माण करणे आहे. मात्र अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कृती एका अत्यंत  महत्त्वाच्या वेळेत आर्थिक मदत आणि विश्वास कमी करण्याचा धोका आहे. ज्यामुळे भारत देश रशिया आणि चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. फोर्ब्सनुसार, अशा प्रकारे अमेरिका अनावधानाने आपली भौगोलिक राजकीय महत्त्व कमी करतेय आणि आपल्या विरोधकांना त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी देतेय. 

Adani Energy Solutions Q3 Results: अदाणी एनर्जीची दमदार कामगिरी, नफ्यात 73 टक्के वाढ

नक्की वाचा - Adani Energy Solutions Q3 Results: अदाणी एनर्जीची दमदार कामगिरी, नफ्यात 73 टक्के वाढ

अमेरिका आपल्या सहकाऱ्यांना कमकुवत करतोय...
या लेखात पश्चिमेकडील देशांवर टीका केली जात आहे. अमेरिका कायदेशीर कारवाईंच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण जागतिक भागीदारीच्या मार्गात  अडथळा निर्माण करत आहे. अमेरिका आणि युरोप आपल्या मित्र देशांना कमकुवत करतोय, ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे चीनसारखे प्रतिस्पर्धी अर्थ, सैन्य आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगती करीत आहेत. लेखक मेलिक कायलान पुढे लिहितात की, अमेरिकेच्या हालचाली पाहून बीजिंगमध्ये बसून ते लोक हसत असतील. 

अमेरिकेतील न्याय विभागाकडून अदाणींवर खटला दाखल करण्याकडे फक्त कायदेशीर पाऊल म्हणून नाही तर धोरणात्मक चूक म्हणून देखील पाहिले पाहिजे. पश्चिम आणि भारतामधील समन्वय जागतिक स्थैर्यासाठी सर्वात गरजेचा आहे त्यावेळी हे पाऊल भारताला एकाकी पाडू शकते, असा इशारा या लेखात शेवटी देण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com